PM Kisan Yojana | PM किसान सन्मान निधीच्या 12 व्या हप्त्याबाबत मोठी माहिती; आधी ‘हे’ काम करा पूर्ण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – PM Kisan Yojana | देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. नुकतचं 31 मे रोजी 2 हजार रुपयांचा 11वा हप्ता पंतप्रधान मोदींच्या वतीने शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आला आहे. त्यानंतर केवायसी (e-KYC) करण्याची अंतिम तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र आता खात्यामध्ये बारावा हप्ता कधी येणार याबाबत माहिती समोर येते आहे.

 

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (PM Kisan Yojana) सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये देते. आता शेतकरी 12 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. या हप्त्याचे पैसे ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान हस्तांतरित होणे अपेक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे. कृषी मंत्रालयाच्या (Ministry of Agriculture) सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकारकडून 1 सप्टेंबर रोजी देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 12 वा हप्ता जमा करणे अपेक्षित आहे. दुसरीकडे, सरकारने ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 जुलैपर्यंत वाढविली आहे.

 

या दरम्यान, प्रत्येकी 2 हजारांच्या 3 हप्त्यांमध्ये ही रक्कम शासनाकडून दिली जातेय.
पहिला हप्ता दरवर्षी 1 एप्रिल ते जुलै दरम्यान, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च या कालावधीत पाठविला जातो.
शेतकऱ्यांच्या खात्यावर 31 मे रोजी पहिला हप्ता (11वा हप्ता) आला आहे.
यापूर्वी 1 जानेवारी 2022 रोजी गेल्या वर्षाचा शेवटचा हप्ता खात्यावर पाठविण्यात आला.

 

Web Title :- PM Kisan Yojana | pm kisan yojana latest update 12th installment to release on 1st sep

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा