PM Kisan Yojana | खुशखबर ! पीएम किसान योजनेच्या शेतकऱ्यांना अल्प दरात मिळणार कर्ज; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan Yojana | केंद्रातील मोदी सरकारकडून (Modi Government) पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा (PM Kisan Yojana) 10 वा हप्ता जारी करण्यात आला आहे. दरम्यान केंद्र सरकारच्या या योजनेचा भारतातील अनेक कोट्यावधी शेतक-यांना फायदा मिळतो आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना (Farmers) परवडणाऱ्या किंमतीत सरकार कर्ज देखील उपलब्ध करून देत आहे. म्हणजेच स्वस्त दरात कर्ज उपलब्ध असणार आहे. याबाबत जाणून घ्या.

 

पीएम किसान सन्मान योजना (PM Kisan Yojana) आणि किसान क्रेडिट कार्ड योजना (Kisan Credit Card Scheme) आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत लिंक करण्यात आल्या आहेत. या किसान क्रेडिट कार्ड योजनेवर सरकार शेतकऱ्यांना कमी किंमतीत म्हणजे परवडणाऱ्या किंमतीत कर्ज उपलब्ध करून देत आहे.

 

दरम्यान, शेतकऱ्यांना पेरणीसाठी बँकांकडून अत्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध आहे. हे कर्ज किसान क्रेडिट कार्डच्या (Kisan Credit Card Scheme) माध्यमातून दिले जाते. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हमीशिवाय दिले जाते. त्याचबरोबर पाच ते तीन लाख रुपयाचे कमी मुदतीचे कर्ज फक्त 4 टक्के व्याजदराने दिले जातेय. या कर्जावर सरकार दोन टक्के सबसिडी देते. तसेच, कर्जाची वेळेवर परतफेड केल्यास तीन टक्के सूट दिली जातेय. म्हणजेच हे कर्ज फक्त 4 टक्के दराने मिळते, परंतु कर्जाची परतफेड करण्यास विलंब झाल्यास, या कर्जाचा व्याज दर 7 टक्के आकारला जातोय.

 

असं बनवा किसान Credit Card –

किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) बनवण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला तहसीलमध्ये जाऊन लेखपाल यांना भेटावे.

लेखपाल यांच्याकडून तुमच्या जमिनीचे कागदपत्रे काढून घ्यावी लागतील.

यानंतर, कोणत्याही बँकेत जाऊन बँक व्यवस्थापकाला भेटावे लागेल. त्यांच्याकडे किसान क्रेडिट कार्ड बनवण्याची मागणी करावी लागेल.

जर किसान क्रेडिट कार्ड ग्रामीण बँकेतून बनवले असेल, तर सरकारकडून प्रोत्साहन वगैरे दिले जाते, ज्याचा लाभ शेतकऱ्यांना होतो.

यानंतर बँक व्यवस्थापक तुम्हाला वकिलाकडे पाठवेल आणि आवश्यक माहिती घेईल.

यानंतर तुम्हाला बँकेत जाऊन एक फॉर्म भरावा लागेल.

यासह काही कागदपत्रे असतील. त्यानंतर तुमचे किसान क्रेडिट कार्ड तयार होईल.

यामध्ये किती कर्जाची सुविधा मिळेल, हे तुमच्याकडे किती जमीन आहे, यावर अवलंबून आहे.

 

Web Title :- PM Kisan Yojana | pm kisan yojana update kisan credit card online apply online registraion see here all process

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा