PM Kisan Yojana | पीएम किसानच्या पुढील हप्त्याबाबत आली नवीन अपडेट, कधी येणार तुमच्या खात्यात पैसे?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan Yojana | लाखो शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) च्या नवीन हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. याआधी अनेक मीडिया रिपोर्टमध्ये 1 सप्टेंबरला शेतकर्यांच्या खात्यात पैसे येतील, असे सांगण्यात आले होते. पीएम किसानचा 12 वा हप्ता अद्याप आलेला नसला तरी शेतकरी प्रतीक्षा करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएम किसानचा पुढील म्हणजे 12 वा हप्ता दसर्याच्या आसपास येऊ शकतो. यावर सरकार काम करत आहे. म्हणजेच ऑक्टोबरमध्ये तुमच्या बँक खात्यात 2,000 रुपयांचा हप्ता येऊ शकतो. (PM Kisan Yojana)
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी 6 हजार रुपये देशातील शेतकर्यांच्या खात्यात ट्रान्सफर करते. दर 4 महिन्यांनी शेतकर्यांच्या खात्यात 2 हजार रुपये पाठवले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 31 मे 2022 रोजी पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत 2000 रुपयांचा 11 वा हप्ता शेतकर्यांच्या खात्यात ट्रान्सफर केला. (PM Kisan Yojana)
ट्रान्सफर झाले आहेत 11व्या हप्त्याचे पैसे
पीएम किसान योजनेंतर्गत पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान, तर दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान दिला जातो. त्याच वेळी, तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान ट्रान्सफर केला जातो. आतापर्यंत, टाइमलाइननुसार, 11 व्या हप्त्याचे पैसे ट्रान्सफर केले गेले आहेत. आता पुढील 12 वा हप्ता 1 सप्टेंबरला येऊ शकतो.
रजिस्ट्रेशनची प्रक्रिया
पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर नोंदणी करावी लागते. या योजनेत नोंदणी करणे अगदी सोपे आहे. ही प्रक्रिया घरबसल्या ऑनलाइन पूर्ण करू शकता. याशिवाय योजनेसाठी पंचायत सचिव किंवा पटवारी किंवा स्थानिक कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे अर्ज करू शकता. याशिवाय पीएम किसान योजनेचा हप्ता मिळविण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे.
कसे तपासावे स्टेटस
– प्रथम पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.
– येथे उजव्या बाजूला Farmers Corner चा पर्याय दिसेल.
– येथे Beneficiary Status पर्यायावर क्लिक करा. नवीन पेज उघडेल.
– नवीन पेजवर, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यापैकी कोणताही एक पर्याय निवडा. या तीन क्रमांकांद्वारे खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तपासू शकता.
– निवडलेल्या पर्यायाची संख्या नोंदवा. त्यानंतर Get Data वर क्लिक करा.
– येथे क्लिक केल्यानंतर, सर्व व्यवहाराची माहिती मिळेल.
– जर FTO is generated and Payment confirmation is pending लिहिलेले दिसत असेल तर याचा अर्थ रकमेवर प्रक्रिया सुरू आहे.
Web Title :- PM Kisan Yojana | pm kisan yojna new update on the next installment of pm kisan
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime | गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या, 8 दिवसांपासून होता बेपत्ता; लोणी काळभोर परिसरातील घटना
Flying Bike Video | स्वप्न नाही सत्य, ही आहे जगातील पहिली उडणारी बाईक, टॉप स्पीड- 100 kph