PM Kisan Yojana अंतर्गत जर केले नसेल ‘हे’ काम तर येणार नाहीत 11व्या हप्त्याचे 2,000 रुपये; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) अंतर्गत अनेक नियम बदलण्यात आले आहेत. शेतकर्‍यांच्या खात्यावर दहावा हप्ता पाठवण्यापूर्वीच हा बदल करण्यात आला आहे. मात्र, त्यातील काही 10 व्या हप्त्यादरम्यान लागू झाले नाहीत. पण आता जर तुम्हाला PM Kisan Yojana अंतर्गत पुढील हप्ता म्हणजेच 11 वा हप्ता घ्यायचा असेल, तर तुम्हाला हे काम करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय खात्यात पैसे पाठवले जाणार नाहीत. पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, शेतकर्‍यांनी E-KYC करणे आवश्यक आहे.

 

कोण-कोणते केले बदल
पीएम किसान योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) कागदपत्रांमध्ये बदल करण्यात आले आहेत. याअंतर्गत रेशनकार्ड देणे बंधनकारक करण्यात आले आहे, जर कोणी या योजनेअंतर्गत रेशनकार्ड जमा केले नाही तर ही रक्कम त्याच्या खात्यात येणे थांबू शकते. फसवणूक टाळण्यासाठी हे करण्यात आले आहे. त्याचबरोबर ई-केवायसी देखील अनिवार्य करण्यात आले आहे. याशिवाय स्टेटस तपासण्याच्या पद्धतीतही बदल करण्यात आला आहे.

कसे करावे ई-केवायसी

पीएम किसान योजनेअंतर्गत EKYC अनिवार्य आहे.

यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.

येथे फार्मर कॉर्नरच्या कोपर्‍यात ई-केवायसीचा पर्याय दिसेल.

त्यावर क्लिक केल्यावर एक नवीन पेज उघडेल.

यानंतर, आधार क्रमांक टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा.

आता नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी येईल.

तो नोंदवताच ई-केवायसी पूर्ण होईल.

ई-केवायसी न केल्यास ते अवैध ठरेल. म्हणजे पुढचा हप्ता तुमच्या खात्यात येणार नाही.

 

कधी येईल पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता
पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत, केंद्र सरकार दरवर्षी 2000-2000 च्या तीन हप्त्यांमध्ये शेतकर्‍यांच्या खात्यात 6000 रुपये पाठवते. आतापर्यंत सरकारने 10 हप्ते जारी केले असून 12 कोटींहून अधिक नोंदणीकृत शेतकर्‍यांच्या खात्यावर 11 वा हप्ता पाठवला जाणार आहे. हा हप्ता एप्रिलमध्ये जारी केला जाऊ शकतो.

 

Web Title :- PM Kisan Yojana | under pm kisan yojana you will not do this work then 2000 rupees of 11th installment will not come

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Essential Vitamin | उत्तम आरोग्य आणि फिटनेससाठी अतिशय आवश्यक आहेत ‘हे’ 10 व्हिटॅमिन, जाणून घ्या – कोणत्या फूड्सद्वारे मिळेल

 

Eknath Khadse | ‘…म्हणून अण्णा हजारे यांचा वाईनला विरोध’, राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितलं

 

जर Aadhaar Card बाबत केले ‘हे’ काम तर होईल कारावास, होऊ शकतो 1 कोटीपर्यंतचा दंड सुद्धा !