PM Kisan Yojana Update | 11 वा हप्ता येण्यापूर्वी पीएम किसान योजनेत झाले ‘हे’ मोठे बदल, लवकर करा अपडेट अन्यथा…

नवी दिल्ली : वृत्त संस्था – PM Kisan Yojana Update | कोट्यवधी शेतकर्यांना आता प्रधानमंत्री किसान योजनेच्या 11 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. जर तुम्ही सुद्धा पीएम किसान योजनेत रजिस्ट्रेशन केलेले असेल आणि 11 व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे (PM Kisan Yojana Update). 11 व्या हप्त्याचे 2000 रूपये लवकरच शेतकर्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. या योजनेंतर्गत आतापर्यंत कोट्यवधी शेतकर्यांया खात्यात 10 व्या हप्त्याचे पैसे आलेले आहेत. (PM Kisan Samman Nidhi Yojana 11th Installment Updates 8 Change Scheme Whether You Will Have To Return Money)
11 वा हप्त्या येण्यापूर्वी पीएम किसान योजनेत अनेक मोठे बदल झाले आहेत. तुम्ही सुद्धा तुमची कागदपत्रे अपडेट केलेली नसतील तर तुम्ही चुकीच्या पद्धतीने पैसे घेणार्या लोकांच्या यादीत समाविष्ठ व्हाल. इतकेच नव्हे तर तुम्हाला आतापर्यंत मिळालेल्या सर्व हप्त्यांचे पैसे परत द्यावे लागतील. 11 वा हप्ता देण्यापूर्वी सरकारने फसवेगिरी टाळण्यासाठी अनेक कागदपत्रे अनिवार्य केली आहेत. जर तुम्ही ही कागदपत्रे अपडेट केली नाही तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. (PM Kisan Yojana Update)
पीएम किसानमध्ये (PM Kisan) झाले हे मोठे बदल
आता शेतकर्यांना 11 व्या हप्त्यासाठी e-KYC पूर्ण करावे लागणार आहे. म्हणजेच आता 11 व्या हप्त्यासाठी शेतकर्यांना अनेक नवीन नियमांसह अर्ज करावा लागणार आहे.
पीएम किसान योजनेच्या लाभार्थींना पुढील हप्ते म्हणजे 11 व्या हप्त्याचे पैसे (11th Installment Money) तुम्ही ई-केवायसी पूर्ण केल्यावरच मिळतील.
e-KYC शिवाय तुमचा हप्ता अडकू शकतो. लवकरच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 11 वा हप्ता देखील जारी केला जाईल.
पीएम किसान पोर्टलवर असे सांगण्यात आले आहे की, आधार आधारित OTP प्रमाणीकरणासाठी शेतकर्यांना Kisan Corner
मधील ई-केवायसी पर्यायावर क्लिक करावे लागेल. बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्राला भेट द्यावी लागेल.
हे काम तुम्ही तुमचा मोबाईल, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवरून घरी बसूनही करू शकता.
Web Title : PM Kisan Yojana Update | pm kisan samman nidhi yojana 11th installment
updates 8 change scheme whether you will have to return money
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime | घरात घुसून 18 वर्षाच्या तरुणीचा विनयभंग, हडपसरच्या फुरसुंगी परिसरातील घटना