PM-Kisan : सरकारनं तुमच्या खात्यावर 2000 रुपयांचा हप्ता पाठविला आहे की नाही, ‘या’ पद्धतीनं तपासा
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पीएम किसानचे लाभार्थी उत्सुकतेने 2 हजार रुपयांच्या सहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, सरकार या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना या महिन्यात 2 हजार रुपयांचा हप्ता पाठवू शकते. यापूर्वी एप्रिलमध्ये सरकारने दोन हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठविली. यामुळे कोरोना संकटाशी झगडत असलेल्या देशातील अन्नदात्यांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपयांची रक्कम पाठवते. ही रक्कम शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यांमध्ये पाठविली जाते.
ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दोन हजार रुपयांचे पाच हप्ते पाठविले आहेत. जर आपणही या योजनेचे लाभार्थी असाल आणि सरकारने तुमच्या खात्यात आतापर्यंत किती रक्कम किंवा किती हप्ते पाठविले आहे, हे जाणून घेऊ इच्छित असल्यास आपण काही मिनिटांत ते तपासू शकता. दरम्यान, पंतप्रधान किसान पोर्टलच्या माध्यमातून सरकार या योजनेशी संबंधित सर्व सुविधा शेतकऱ्यांना पुरविते. याद्वारे शेतकरी या योजनेशी संबंधित जवळपास सर्व कामे केवळ काही क्लिकवर करु शकतात. त्याचप्रमाणे या योजनेंतर्गत सरकारने आपल्या खात्यात 2 हजार रुपयांचा हप्ता पाठविला आहे की नाही हेही तपासणे सोपे आहे.
– सर्वप्रथम पीएम किसान यांच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करा.
– आता उजवीकडे असलेल्या Farmers Corner वर जा.
– येथे तुम्हाला ‘ Beneficiary Status ‘ हा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करा.
– आता आपल्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
– नवीन पृष्ठावर आपल्याला एक आधार नंबर, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल नंबर निवडावा लागेल.
– आपण जो पर्याय निवडला आहे, तो नंबर दिलेल्या जागी टाका.
– आता आपल्याला Get Data या लिंकवर क्लिक करावे लागेल.
आता सर्व डेटा तुमच्या समोर येईल. यामध्ये, आपला आधार क्रमांकाचे शेवटचे चार डिजिट, मोबाइल नंबर आणि खाते क्रमांकाचेही शेवटचे चार अंक दिसतील. आपला पत्ता, नोंदणी क्रमांक, नोंदणीची तारीख आणि नोंदणीची स्थिती देखील आपल्याला मिळेल. आपला आधार नंबर पडताळला आहे की नाही याची माहितीही मिळेल. यानंतर, प्रत्येक हप्त्याच्या देयकाशी संबंधित माहिती आपल्या समोर असेल. त्यामध्ये हप्ता क्रमांक, खाते क्रमांकाचे शेवटचे चार अंक, पैसे जमा झाल्याची तारीख, यूटीआर क्रमांक असतो. या व्यतिरिक्त कोणताही व्यवहार अयशस्वी झाल्यास त्यामागील कारणही येथे नोंदवले जाईल.