PM Kisan | मोदी सरकार शेतकर्‍यांना देतंय ‘स्वस्त’ कर्ज, जाणून घ्या काय करावे लागेल?

नवी दिल्ली : जर तुम्ही मोदी सरकारच्या पीएम किसान योजनेसाठी (PM kisan yojna) पात्र आहात तर तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. केंद्र सरकार पीएम किसान योजनेतील (PM kisan) पात्र शेतकर्‍यांना स्वस्त कर्जसुद्धा देत आहे. किसान क्रेडिट कार्ड (KCC) चे लाभार्थी स्वस्त कर्जाचा लाभ घेऊ शकतात. या कर्जातून शेतकरी आपल्या शेतीची कामे करू शकतो.

जाणून घ्या किती मिळते कर्ज?

किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) वर शेतकर्‍यांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते. हे कर्ज 9 टक्केच्या व्याजदराने मिळते. सरकार यावर 2 टक्केची सबसिडी देते आणि शेतकर्‍यांना ते 7 टक्केच्या दराने मिळते. कर्ज वेळेपूर्वीचे फेडले तर त्यांना व्याज 3 टक्के दराने मिळते.

ही कागदपत्र पाहिजेत

किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटोची आवश्यकता आहे. हे प्रतिज्ञापत्राद्वारे सांगावे लागेल की, तुम्ही इतर बँकेकडून कोणतेही कर्ज घेतलेले नाही.

येथे मिळेल फॉर्म

किसान क्रेडिट कार्डचा फॉर्म पीएम किसान योजनेची वेबसाइट pmkisan.gov.in वर मिळेल.
येथून फॉर्म डाऊनलोड करू शकता. फॉर्म भरून आणि जवळच्या बँक ब्रँचमध्ये जमा करायचा आहे.

या बँकांमध्ये जमा करू शकता फॉर्म

किसान क्रेडिट कार्ड देणार्‍या बँकांमध्ये भारतीय स्टेट बँक (SBI), बँक ऑफ इंडिया आणि भारतीय औद्योगिक विकास बँक (IDBI) तसेच कोणत्याही सहकारी बँकेत जमा करू शकता.

हे देखील वाचा

Digital Currency | भारतात येणार स्वत:ची Digital Currency

Government Job | पदवीधर आणि 10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, थेट मुलाखत; जाणून घ्या सविस्तर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  PM Kisan | you can get 3 lakh loan under pm kisan scheme check how details here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update