PM Kusum Yojana | Fact Check : पीएम कुसुम योजना ! तुम्हाला देखील आलाय का ‘हा’ मेसेज? इथं जाणून घ्या ‘सत्य’ अन्यथा होईल मोठं नुकसान

नवी दिल्ली : सरकारी योजनांच्या नावावर लोकांना फसवण्याचे उद्योग सध्या जोरात सुरू आहेत. सायबर गुन्हेगार (Cyber ​​criminals) यासाठी सोशल मीडियाचा (Social media) वापर करत आहेत. सध्या, सोशल मीडियावर केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या कुसुम योजनेबाबत (PM Kusum Yojana) एक माहिती शेयर केली जात आहे. यामध्ये  ऊर्जा मंत्रालयाचे एक लेटरपॅडसुद्धा शेयर केले जात आहे. या पोस्टमध्ये कोणती माहिती शेयर केली जात आहे आणि ती सत्य (PM Kusum Yojana) आहे का, याबाबत जाणून घेवूयात…

PM Kusum Yojana | fact check people are sharing fake ministry approval letter for 5600 legal fee check here all details

कोणता दावा केला जातोय?

सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाच्या नावाचे एक लेटरपॅड शेयर केले जात आहे. सोबतच मंत्रालयाच्या नावावर पीएम कुसुम योजनेंतर्गत सोलर पम्प इन्स्टॉल करण्यासाठी 5600 रुपये लीगल चार्ज म्हणून मागितले जात आहेत.

काय आहे सत्य?

या पोस्टमध्ये केलेले सर्व दावे चुकीचे असल्याचे आढळून आले आहे. पीआयबी फॅक्ट चेक टीमने या पोस्टची पडताळणी केली, ज्यामध्ये हा दावा चुकीचा आढळला. पीआयबी फॅक्ट चेकने (PIB fact check) अधिकृत ट्विटर अकाऊंटवर लिहिले आहे की, पीएम कुसुम योजनेत सोलर पम्प इन्स्टॉल करण्यासाठी लीगल चार्जच्या रूपात नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाच्या फेक अप्रूव्हल लेटरद्वारे 5600 रुपये मागितले जात आहेत. मंत्रालयाकडून कोणतेही पत्र जारी करण्यात आलेले नाही.

मंत्रालयाने सुद्धा दिली माहिती

मंत्रालयाने सुद्धा आपल्या अधिकृत वेबसाइटच्या होमपेजवर एका अलर्टमध्ये माहिती दिली आहे की, पीएम
कुसुम योजनेच्या नावावर फसवणुक करणार्‍या वेबसाइटपासून सावध राहण्याची आावश्यकता आहे.

मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे की, अनेक बनावट वेबसाइट आणि मोबाइल अ‍ॅप्लिकेशन अर्जदारांकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाअभियान PM Kusum Yojana (प्रधानमंत्री-कुसुम योजना) च्या नावावर शेतकर्‍यांकडून सोलर पम्प लावण्याच्या हेतुसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासह नोंदणी शुल्क तसेच पम्पाची किंमत ऑनलाइन भरण्यास सांगितले जात आहे.

या आहेत फसवणूक करणार्‍या वेबसाइट

यापैकी काही बनावट वेबसाइटचे डोमेन नाव * .org, * .in, * .com मध्ये नोंदणीकृत आहे जसे की .kusumyojanaonline.in.netwww.pmkisankusumyojana.co.inwww.onlinekusamyojana.org.inwww.pmkisankusumyojana.com आणि अशाप्रकारच्या इतर अनेक वेबसाइट आहेत.

हे देखील वाचा

Mumbai Rains | मुंबईला जाताय तर अगोदर जाणून घ्या तेथील परिस्थिती; अतिवृष्टीमुळे पावसाने रेल्वेसह वाहतूक ठप्प

Pune Crime | 67 बँक अकाऊंट वापरत पुण्यातील महिलेला 4 कोटींचा गंडा; दिल्लीतून दोघांना अटक, 21 मोबाईल, हार्ड डिस्क, 5 नेट डोंगल, 3 पेन ड्राईव्ह, 4 लॅपटॉप, आणि 8 Sim Card जप्त

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  PM Kusum Yojana | fact check people are sharing fake ministry approval letter for 5600 legal fee check here all details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update