लॉकडाऊन दरम्यान सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा 80 कोटी लोकांना फायदा – अर्थमंत्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2021 या वर्षांचा देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी लॉकडाऊन दरम्यान सरकारनं केलेल्या कामगिरीची माहिती दिली. 3 आठवड्याच्या लॉकडाऊन दरम्यान पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची सुरूवात केली असून याचा फायदा देशातील 80 कोटी लोकांना झाला आहे, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलीय.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प हा वेगळा होता. यावेळी कोणत्याही कागदपत्रांशिवाय टॅबच्या सहाय्याने हा अर्थसंकल्प मांडला आहे.

तीन आठवड्यांच्या पूर्ण लॉकडाऊन दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याण योजना सुरू केलीय. याचा फायदा देशातील 80 कोटी लोकांना झालाय. आठ कोटी लोकांना मोफत गॅस सिलिंडर मिळाले आहेत. या कालावधीत अधिक संख्येत लोकं आपापल्या घरात राहत होती. असं असलं तर आरोग्य सेवक, बँक कर्मचारी, वीज कर्मचारी, आपले अन्नदाते आणि जवान कार्यरत होते, असेही निर्मला सीतारामन म्हणाल्या आहेत.

या कालावधीमध्ये सदनातील सर्व सदस्यांनी ज्याप्रकारे साथ दिली त्यांचे मी आभार मानते. विधानसभा सदस्य आणि लोकसभेचे सदस्य यांनी आपलं वेतनही या महासाथीदरम्यान दिलंय. या कालावधीत सरकारने ‘आत्मनिर्भर’ पॅकेज जाहीर केलंय. यावेळी सरकारने एकूण 27.1 लाख कोटी रूपये दिलेत. जे देशाच्या जीडीपीच्या 13 टक्के आहेत, असं देखील त्यांनी सांगितलं आहे.

ज्या प्रकारे अर्थसंकल्प तयार केला. तसा याअगोदरही कधीही तयार केला नाही. हे एक आव्हान होतं. मागील वेळी जेव्हा आम्ही अर्थसंकल्प सादर केला, तेव्हा जागतिक अर्थव्यवस्था कोणत्या दिशेला जाणार? हे आम्हाला माहित नव्हतं. कोणालाच ही कल्पनाही नव्हती की, आपण एका महासाथीच्या दिशेने जात आहोत, असं सीतारामन यांनी नमूद केलंय.

आपल्याकडे आज 2 लसी उपलब्ध आहेत. 100 पेक्षा जास्त देशांना त्याचा फायदा मिळतोय. अजून दोन लसी लवकर येणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या वैज्ञानिकांना धन्यवाद दिलेत. 2021 मध्येही आपलं ये युद्ध सुरू आहे. जागतिक युद्धानंतर जसे बदल घडले तसे कोरोनाच्या युद्धानंतर रणनितीक संबंधांत बदल होतील. भारत लँड ऑफ होपकडे पाहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलंय.