PM Modi | खा. विखे-पाटील यांच्या 10 वर्षाच्या मुलीनं PM मोदींना भेटण्यासाठी केला मेल, ‘धावत ये मुली’ असं उत्तर मिळाल्यानंतर भरपूर विचारले ‘अनिशा’नं प्रश्न

अहमदनगर – (PM Modi) महाराष्ट्रातील भाजपा नेते आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची नात आणि खासदार सुजय विखे पाटील (mp dr sujay vikhe patil) यांची मुलगी सध्या चर्चेत आहेत. 10 वर्षांची मुलगी अनिशा पाटीलने (Anisha) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना भेटण्याचा हट्ट धरला होता. मात्र, तिचे वडिल ही गोष्ट टाळत राहिले.

नंतर एक दिवस मुलगी अनिशाने पंतप्रधानांच्या भेटीसाठी त्यांच्या ईमेल आयडीवर मेसेज पाठवला. ज्यानंतर मोदी स्वत: अनिशाला भेटले. त्यांनी 10 मिनिटांपर्यंत एकांतात तिच्याशी खुप गप्पा मारल्या. इतके की मुलीच्या प्रश्नांवर पंतप्रधान जोरजोरात हसत देखील होते.

अनिशाचे वडिल सुजय पाटील यांनी सांगितले की, माझी 10 वर्षांची मुलगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी हट्ट करत होती. पण, मी टाळत होतो. मी तिला सांगायचो की मोदीजी तर पंतप्रधान आहेत आणि ते आपल्या कामावर आहेत. पण, तिने ऐकले नाही. एक दिवस तिने ईमेल करून थेट मोदीजींना मेसेज पाठवला. ज्यामध्ये लिहिले, हॅलो सर, मी अनिशा आहे…आणि मला येऊन तुम्हाला खरोखर भेटायचे आहे.

Pimpri Chinchwad Police | पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मिळणार आणखी 1 अपर आयुक्त, 2 DCP, 4 ACP; BDDS ला देखील राज्य शासनाची मंजुरी

काही वेळानंतर पंतप्रधानांकडून अनिशाला उत्तर आले, तेव्हा ती आनंदाने नाचू लागली. त्यामध्ये लिहिले होते : धावत ये मुली!

याच संदेशात अनिशाला भेटण्याची वेळ सांगण्यात आली होती. ज्यानंतर दुसर्‍याच दिवशी विखे पाटील कुटुंबातील सर्व लोक पंतप्रधानांच्या भेटीला पोहचले. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारले, अनिशा कुठे आहे?

मोदींनी दिली उत्तरे आणि भेटले

अनिशा संसदेनंतर पंतप्रधानांना भेटली. मोदींनी तिला चॉकलेट दिले आणि नंतर दोघे बोलू लागले. अनिशाने प्रश्न विचारले – ‘हे तुमचे ऑफिस आहे का? तुम्ही संपूर्ण दिवस इथे बसता का? हे किती मोठं ऑफिस आहे.

अशाप्रकारे अनिशा प्रश्न विचारत राहिली आणि पंतप्रधान मोदींनी तिच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली.

मुलीच्या प्रश्नांवर खळाळून हसले मोदी

मोदींनी अनिशाला विचारले, परंतु आज इथे मी तुला भेटायला आलो आहे आणि मला तुझ्याशी
बोलायचे आहे. हे ऐकून अनिशा खुप खुश झाली. जेव्हा मोदी तिच्या प्रश्नांची उत्तरे देत होते तेव्हा
अनिशाने विचारले, तुम्ही गुजरातचे आहात का? मोदी म्हणाले – ‘हां!‘ यानंतर अनिशा म्हणाली – मग तुम्ही भारताचे राष्ट्रपती कधी बनणार?

यावर पंतप्रधान मोदी खळखळून हसू लागले आणि तिथे उपस्थित इतर लोक सुद्धा हसू लागले. या
प्रश्नानंतर सुजय पाटील यांनी आपल्या मुलीला थांबवले. तत्पूर्वी, अनिशाने 10 मिनिटे पंतप्रधान मोदी यांच्याशी खुप गप्पा मारल्या होत्या.

हे देखील वाचा

Maharashtra Corona | पुण्यासह ‘या’ 7 जिल्ह्यांनी महाराष्ट्राची चिंता वाढवली, आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट राज्यापेक्षा अधिक

Anti Corruption Nashik | लाचखोर महिला शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकारांकडे कोटयावधीची संपत्ती, जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : PM Modi | 10 years baby girl mailed from ahmednagar to prime minister narendra modi met in parliament

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update