चीनवर बोलायचं होतं तर बोलून गेले चन्यावर, ईदसुद्धा विसरले PM मोदी : ओवैसी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधित केले. यामध्ये खास फोकस कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनवर होता. परंतु, अंदाज लावला जात होता की, चीनच्या मुद्द्यावर पंतप्रधान काहीतरी बोलतील, पण त्यांनी चीनचे नावही घेतले नाही. चीनचा उल्लेख न केल्याने ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला ओवैसी म्हणाले आज चीनवर बोलायचे होते, बोलून गेले चन्यावर.

ट्विटर हँडल पीएमओ इंडियाला टॅग करत असदुद्दीन ओवैसी यांनी लिहिले, आज त्यांना चीनवर बोलायचे होते, बोलून गेले चन्यावर. मात्र, याची जरूरतसुद्धा होती, कारण तुमच्या अनियोजित लॉकडाऊनने अनेक लोकांना उपाशी ठेवले आहे. सणांवरूनही ओवैसी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या संबोधनावर निशाणा साधला. ओवैसी म्हणाले, तुम्ही पुढील महिन्यात येणार्‍या अनेक सणांची नावे घेतली, परंतु बकरी ईद विसरलात. जाऊ द्या, तरीसुद्धा तुम्हाला अ‍ॅडव्हान्समध्ये ईद मुबारक.

काँग्रेसचा सुद्धा हल्ला

काँग्रेसने सुद्धा एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधानांनी देशवासियांना अनियोजित लॉकडाऊनमुळे झालेले फायदे सांगितले पाहिजेत होते. कोरोना नियंत्रणाच्या बाबतीत तर लॉकडाऊन पूर्णपणे विफल सिद्ध झाले आहे. देशाला माहिती आहे की, अनियोजित लॉकडाऊनचे ठरलेले लक्ष्य देश गाठू शकला की नाही?

यासोबत काँग्रेसने, पंतप्रधानांनी संबोधनात चीनच्या मुद्द्याचा उल्लेख न केल्याने प्रश्न उपस्थित केला आहे. ट्विटमध्ये काँग्रेसने म्हटले आहे की, टीका करण्याची गोष्ट विसरून गेले, आपल्या राष्ट्रीय संबोधनात चीनचा उल्लेख करण्यास सुद्धा ते घाबरतात. मोदींचे संबोधन एखादी सरकारी अधिसूचना होऊ शकली असती. मात्र, काँग्रेसने गरिबांसाठी अन्न योजना नोव्हेंबरपर्यंत वाढवल्याबद्दल मोदींचे कौतुक केले.

काँग्रेसने म्हटले की, हे जाणून आनंद वाटला की, पंतप्रधानांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींच्या विनंतीकडे लक्ष दिले आहे. ज्यामध्ये गरीबांना मोफत धान्य देण्याची योजना पुढे वाढविण्याची मागणी केली होती.

काय म्हणाले पंतपधान

आपल्या संबोधनात मोदी म्हणाले, कोरोना जागतिक महामारीविरोधात लढता-लढता आपण अनलॉक2 मध्ये प्रवेश करत आहोत. आपण यासोबतच सर्दी-खोकला, तापाच्या ऋतूमध्ये सुद्धा प्रवेश करत आहोत. लोकांना आवाहन आहे की, काळजी घ्या. अनलॉक-1 च्यानंतर लोकांचा बेजबाबदारपणा वाढत चालला आहे. कंटेनमेन्ट झोनमध्ये जास्त लक्ष द्यावे लागेल. लोकांना लॉकडाऊन सारखी सतर्कता बाळगावी लागेल. बेपर्वाई करणार्‍या लोकांना समजवा. देशात कुणीही नियमांपेक्षा मोठे नाही. गावाचा सरपंच असो की, पीएम, कोणीही नियमापेक्षा मोठे नाही.

मोदी म्हणाले, जर कोरोनामुळे होणारा मृत्यूदर पाहिला तर जगातील अनेक देशांच्या तुलनेत भारताची स्थिती नियंत्रणात वाटते. योग्यवेळी केलेला लॉकडाऊन आणि इतर निर्णयांनी भारतात लाखो लोकांचा जीव वाचवला आहे. परंतु, जेव्हापासून देशात अनलॉक वन सुरू झाले आहे बेपर्वाई काहीशी वाढत चालली आहे.

पंतप्रधान म्हणाले, अगोदर आपण मास्क, सामाजिक अंतर, 20 सेकंदपर्यंत दिवसभरात अनेकदा हात धुणे, इत्यादीच्या बाबतीत सतर्क होतो. आता सरकारांनी, स्थानिक संस्थांनी, स्थानिक दुकानदारांनी, देशाच्या नागरिकांनी सतर्कता दाखवण्याची गरज आहे.