हिंमत असेल तर काँग्रेससह विरोधकांनी कलम 370, तिहेरी तलाकचा जाहीरनाम्यात उल्लेख करावा : PM मोदी

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांची आज जळगावमध्ये पहिली प्रचार सभा पार पडली. पुढील 5 वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार यावं असे आवाहन करत मोदींनी कलम 370, 35A, तिहेरी तलाक या मुद्द्यांवरून विरोधकांवर निशाणा साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील मुद्दे –

370, 35A वर मोदींचे विरोधकांना आव्हान –

370, 35A वरून विरोधकांवर टीका करताना पंतप्रधान म्हणाले की , आज मी विरोधकांना आव्हान देतो की , जर तुमच्यात हिम्मत असेल तर या निवडणुकीत काश्मीरविषयी भूमिका स्पष्ट करावी . विरोधकांनी जम्मू-काश्मीर आणि लडाखबद्दल बेताल वक्तव्य करण्यापेक्षा आगामी निवडणुकीत जम्मू काश्मीरमधून कलम 370 आणि 35A परत आणू असे निवडणूक जाहीरनाम्यात जाहीर करावे. तुमच्यात हिंमत असेल तर 5 ऑगस्टचा निर्णय बदला नाहीतर उगाच खोटे अश्रू काढू नका.

हिम्मत असेल तर तिहेरी तलाकची प्रथा पुन्हा आणून दाखवा –

कॉंग्रेससह सर्वच पक्षांनी तिहेरी तलाकची प्रथा सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र आम्ही मुस्लिम माता-भगिनींना दिलेले वचन पाळले. आपले संकल्प आणि त्यांची सिद्धी ही आपली मूल्ये आहेत. यामध्ये मी विरोधी पक्षांना आव्हान देतो की जर तुमच्यात हिम्मत असेल तर तिहेरी तलाकची प्रथा पुन्हा आणू हे जाहीर करा. विरोधक असं करणार नाही कारण त्यांना माहित आहे की तिहेरी तालकमुळेच केवळ मुस्लिम माता-भगिनींनाचे आतापर्यन्त हक्क डावलण्यात आले आहेत . मुस्लिम पुरुषांना भाऊ व वडील या नात्याने हा कायदा रद्द झालेला योग्य वाटतो.

यापूर्वी कलम 370 रद्द करणे अशक्य वाटत होते

5 ऑगस्ट रोजी आपल्या भाजपा-एनडीए सरकारने अभूतपूर्व निर्णय घेतला. त्यापूर्वी कलम 370 रद्द करणे असंभव वाटत होते. शेजारील राष्ट्रामुळं तिथं अशांतता होती , रक्तपात घडत होता म्हणून आम्ही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक पावले उचलली.

काँग्रेस, राष्ट्रवादी पाकिस्तानची भाषा बोलतात

गेल्या काही महिन्यांतील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची विधाने पहा जम्मू काश्मीरमधील लोकांच्या विरुद्ध भावना काँग्रेस-राष्ट्रवादीची दिसून येते. शेजारील राष्ट्रांना मदत होईल असे वक्तव्य करतात. ते देशाच्या भावना घेऊन उभे राहण्यास कचरत आहेत.

नवीन भारताचा नवा उत्साह जग पाहत आहे

पंतप्रधानांनी भाषणाच्या सुरूवातीस सांगितले की नवीन भारताचा नवा उत्साह जगाने पाहिला आहे. जगभरात देशाला सन्मान मिळत आहे. प्रत्येक देश, जगातील प्रत्येक भाग भारताच्या पाठीशी उभा आहे. भारताशी जवळून काम करण्यास उत्सुक आहे.हे मोदींमुळे नव्हे तर तुमच्या मतामुळे घडत आहे. आज, नवीन भारत केवळ आपले वर्तमान मजबूत करीत नाही तर भविष्यासाठी स्वतःलाही तयार करीत आहे. चार महिन्यांपूर्वी तुम्ही समर्थ, सशक्त भारताच्या निर्माणासाठी मतदान केलं होतं. जगात भारताला स्थान मिळावं यासाठी तुम्ही मतदान केलं. नव्या भारताचा नवा जोश जगाला दिसू लागला आहे.

राज्यात नरेंद्र मोदी यांच्या नऊ सभा –

पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 ते 18 ऑक्टोबर या काळात राज्यात 9 जाहीर सभांना संबोधित करतील. रविवारी पंतप्रधान मोदींच्या दोन सभांनंतर 16 ऑक्टोबरला अकोला, पनवेल, परतूर येथे तर पुणे, सातारा, परळी येथे 17 ऑक्टोबरला जाहीर सभा होणार आहेत . पंतप्रधानांची 18 ऑक्टोबरला मुंबई येथे महारॅली होणार आहे.

Visit : Policenama.com 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like