PM मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे मित्र पराभवाच्या छायेत ? भारत-इस्त्राइलच्या संबंधावर परिणाम होणार

तेल अविव : वृत्तसंस्था – इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना सार्वत्रिक निवडणुकीत धक्का बसण्याची शक्यता आहे. इस्राइलमधील सार्वत्रिक निवडणूक आटोपल्यानंतर प्रकाशित झालेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार नेतान्याहू यांच्या पक्षाला बहुमत मिळणार नाही. त्यामुळे सत्तेवर असलेली त्यांची जुनी पकड त्यांना कायम राखता येईल की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे.

भारत-इस्त्रायल संबंधांवर परिणाम होणार-

तज्ञांच्या मते, नेतान्याहू सत्तेबाहेर गेले तर त्याचा परिणाम भारत-इस्त्राइल संबंधांवरही दिसून येईल . नेतान्याहू यांच्या कार्यकाळात इस्रायलने अनेक वेळा उघडपणे भारताला पाठिंबा दर्शविला आहे. इस्राईलबरोबर भारताने अनेक मोठे संरक्षण विषयक करारदेखील केले आहेत. नेतान्याहू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. दोन्ही नेत्यांनी बर्‍याच वेळा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ही मैत्री व्यक्त केली आहे.

दोन्ही पक्ष सरकार स्थापनेपासून दूर –

हॅरिटझ वृत्तपत्राने केंद्रीय निवडणूक समितीच्या हवाल्याने म्हटले आहे की , 91 टक्के मतमोजणीनंतर नेतान्याहूच्या मध्य-दक्षिण लिकुड पक्षाला 31 जागा मिळाल्या आहेत, तर मुख्य प्रतिस्पर्धी, बेनी गॅन्ट्झच्या ब्ल्यू अँड व्हाइट पार्टीने 32 जागा जिंकल्या आहेत. दोन्ही पक्ष सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या 61 जागांपेक्षा दोन्ही बाजू दूर आहेत. त्यामुळे मतमोजणीनंतर इस्राइलमध्ये आघाडी सरकार स्थापन होऊ शकते. अमेरिका आणि इराणमधील तणाव लक्षात घेता या निकालाचा परिणाम मध्य-पूर्ववर होऊ शकतो.

पाचव्यांदा विक्रमी पंतप्रधानपदाची अपेक्षा बाळगणारे नेतन्याहू यांनी गँट्झ यांच्या पक्षाशी कोणतीही संभाव्य युती होण्यास नकार दिला आहे. नेतान्याहू यांनी सत्तेत परतल्यावर पश्चिमेकडील पॅलेस्टाईन वसाहती इस्राईलमध्ये विलीन करण्याचे आश्वासन दिले आहे. गॅंटझने त्याच्या कोणत्याही स्वरूपाचे समर्थन केले नाही. तथापि, पॅलेस्टाईन देशाच्या निर्मितीबाबत त्यांची भूमिका स्पष्ट नाही.

माध्यमांच्या वृत्तानुसार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय असलेले नेतान्याहू जर पंतप्रधान झाले तर पॅलेस्टाईनबाबत आपली कठोर भूमिका कायम ठेवतील. नेतान्याहू हे इस्रायलचे प्रदीर्घकाळ काम करणारे पंतप्रधान आहेत. त्यांनी 10 वर्षे हे पद सांभाळले आहे.

visit : Policenama.com 

You might also like