पोलीस महासंचालकांच्या परिषदेसाठी PM मोदी आणि HM शहा पुणे दौर्‍यावर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देश पातळीवर होणारी पोलीस महासंचालकांची परिषद यंदा पुण्यात होत असून, त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा एक दिवसाच्या पुणे दौर्‍यावर आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे सुरक्षा प्रमुख वाय. के. जेठवा यांनी गुरूवारी सुरक्षेचा आढावा घेतला. 8 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहेत.

देशातील पोलीस महासंचालकांची बैठक 6 ते 8 डिसेंबर रोजी बाणेर येथील आयसर (भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था) या संशोधन संस्थेत होणार आहे. यापार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणा तसेच इतर संस्थांनी गेल्या एक महिन्यांपासून पुण्यात बैठका घेऊन आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. गुप्तचर विभागाचे प्रमुख अरविंद कुमार यांनी देखील बैठक घेऊन सुरक्षा यंत्रणांना आवश्यक सुचना दिल्या आहेत.

गेल्या वर्षी ही परिषद गुजरात येथे झाली होती. परिषदेत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा यासह अन्य विषयांवर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. परिषदेला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह दोनच्या जवळपास वरिष्ठ अधिकारी उपस्थित असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा परिषदेला मार्गदर्शन करणार आहेत. देशपातळीवरील संपुर्ण अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असलेल्या या परिषदेमध्ये आगामी वर्षभरातील सुरक्षाविषयक धोरणे निश्चित केली जातात. त्यामुळे ही परिषद महत्वाची मानली जाते.

Visit : policenama.com