पंतप्रधान नरेंद्र मोदी, मनोज तिवारांना जीवे मारण्याची धमकी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्ली भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी तिवारी यांच्या व्यक्तिगत फोन नंबरवर एसएमएसद्वारे देण्यात आली आहे. मोदी आणि तुम्हाला मारण्यासाठी मी मजबूर असल्याचे मेसेजमध्ये म्हटले आहे. तसेच हा मेसेज दिल्ली पोलिसांना देखील आला आहे. त्यानंतर पोलिसांनी वेगाने सुत्र हालवली असून पोलिसांकडून मेसेज पाठवणाऱ्याचा शोध घेत आहेत.

दिल्ली पोलिसांना आलेल्या मेसेजमध्ये, ‘मनोज तिवारी यांना जीवे मारण्यात येणार आहे. मला मजबूरीने हे काम करावे लागत आहे. त्यांना मारण्याबाबत माझ्या मनात तसे कोणताही विचार नव्हत. पण, आता मी मजबूर आहे. तसेच त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील जीवे मारणार असल्याचे मसेजमध्ये म्हटले आहे.’

मनोज तिवारी यांच्या मोबाईलवर शुक्रवारी दुपारी १२ वाजून ५२ मिनीटांनी एसएमएस आला. तिवारी यांनी हा मेसेज शनिवारी रात्री पाहिला. मेसेज पाहिल्यानंतर तात्काळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील त्यांना जीवे मारण्याच धमकी देण्यात आली होती.

आरोग्य विषयक वृत्त –

प्रसूतीनंतर या ” कारणामुळे ” गळतात केस

जुळी मुलं होण्यासाठी अनेक दांपत्य उत्सुक 

महिलांसाठी “योगाचे” महत्व जास्त

“ऍसिडिटीने” त्रस्त असणाऱ्यांसाठी रामबाण उपाय