मोदी सरकारने केली मोठी घोषणा ! 21 हजारपर्यंत सॅलरीवाल्यांना मिळणार पेन्शन, ESIC च्या कौटुंबिक पेन्शन योजनेचा ‘या’ लोकांना होणार लाभ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेने लाखो लोकांचा जीव घेतला आहे. अनेक अशी कुटुंब आहेत ज्यांनी आपला कमावणारा सदस्य गमावला आहे. अशावेळी केंद्र सरकारने त्या कुटुंबांच्या मदतीसाठी आणखी काही उपायांची घोषणा केली आहे. कोविड-19 मुळे जीव गमावणार्‍या अलंबितांना कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) अंतर्गत कौटुंबिक पेन्शन Pension दिली जाईल. ईडीआयएल योजनेंतर्गत मिळणारे विमा लाभ वाढवण्यासह उदारीकरण करण्यात आले आहे.

21,000 रुपये मासिक उत्पन्न असणार्‍यांना मिळणार पेन्शन
ईडीआयएलचा लाभ त्या कर्मचार्‍यांना उपलब्ध आहे, ज्यांचे मासिक उत्पन्न 21,000 रुपये किंवा यापेक्षा कमी आहे. मात्र दिव्यांगांच्या बाबतीत उत्पन्न मर्यादा 25,000 रुपये आहे. सरकारने म्हटले की, अशा पीडित कुटुंबांना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी ही योजना आहे.

चेहऱ्याचे सौंदर्य वाढवा आता घरच्या घरी, जाणून घ्या

24 मार्च 2020 पासून लागू होतील नियम
हा लाभ 24 मार्च 2020 पासून लागू मानला जाईल आणि अशाप्रकारच्या सर्व प्रकरणांसाठी ही सुविधा 24 मार्च 2022 पर्यंत उपलब्ध होईल. त्या व्यक्तीवर अवलंबित कौटुंबिक सदस्यांना सध्याच्या मापदंडानुसार संबंधीत कर्मचारी किंवा कामगाराचे सरासरी दैनिक वेतन किंवा मानधनाच्या 90 टक्केच्या बरोबरीत पेन्शनचा Pension लाभ मिळण्याचा अधिकार असेल.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना
एडली योजनेंतर्गत मिळणारे विमा लाभ वाढवण्यासह त्यांचे उदारीकरण केले आहे. इतर सर्व लाभार्थ्यांशिवाय ही योजना विशेषकरून त्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबांना मतद करेल ज्यांनी कोविडमुळे आपला जीव गमावला आहे. कमाल विमा लाभाची रक्कम 6 लाख रुपयांवरून वाढवून 7 लाख रुपये केली आहे, तर 2.5 लाख रुपयांच्या किमान विमा लाभाची तरतूद देण्यात येणार आहे आणि 15 फेब्रुवारी 2020 ते पुढील तीन वर्षांसाठी प्रभावी असेल.

Also Read This : 

जुन्नरच्या माजी आमदार लतानानी तांबे यांचे 85 व्या वर्षी पुण्यात निधन

लठ्ठपणा टाळण्यासाठी आहारात समावेश करा ‘या’ गोष्टी, जाणून घ्या

EDLI Benefits : PF खातेधारकाच्या अकाली मृत्यूनंतर कुटुंबियांना मिळते 7 लाख रुपयांची रक्कम, जाणून घ्या ‘क्लेम’बाबत

पाणी असणार्‍या ‘या’ 5 फळांचं नक्की सेवन करा, डिहायड्रेशनपासून वाचेल शरीर; जाणून घ्या