PM मोदींनी संतांना केलं आवाहन, म्हणाले – ‘कोरोना संकटामुळं कुंभ आता प्रतिकात्मक केला पाहिजे’

पोलीसनामा ऑनलाइन – हरिद्वार येथे सुरु असलेल्या कुंभात संत-साधू आणि भक्तांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी कळताच प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. अनेक आखाड्यांनी कुंभातून मागे जाण्याची घोषणा केली आहे. याला घेऊन पंतप्रधान मोदी यांनी मोठे विधान केले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, ”आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गुरुजी यांच्यासोबत आज फोनवर बोलणे झाले. सर्व संतांच्या आरोग्याबद्दल विचारणा करण्यात आली. सर्व संत प्रशासनाला सहकार्य करत आहेत. मी यासाठी सर्व संतांचे आभार व्यक्त करतो.

पंतप्रधान पुढे म्हणाले, ”मी प्रार्थना केली आहे की दोन शाही स्नान झाले आहेत आणि आता कुंभाला कोरोना संकटतातही प्रतीकात्मक ठेवले गेले पाहिजे. त्यामुळे या संकटात लढण्यासाठी ताकद मिळेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या ट्विटद्वारे सांगितले त्या ट्विटला तुम्ही येथे पाहू शकता-

तेच पंतप्रधान यांच्या या मुद्यावर कमेंट करत महामंडलेश्वर अवधेशानंद गिरी म्हणाले, ”माननीय पंतप्रधानजी यांच्या अहवानाचा आम्ही सन्मान करतो. स्वतः आणि इतरांच्या आयुष्याचे रक्षण करणे ही पुण्याची बाब आहे. मी धर्म परायण लोकांना विनंती करतो की कोविड संकटांचा विचार करता सर्वांनी कोविड नियमांचे पालन करावे. हरिद्वारमध्ये चालू असलेल्या कुंभमेळ्याचा समारोप २७ एप्रिलला आहे. यापूर्वीच असे अनुमान बांधले जात होते की कुंभमेळा वेळेपूर्वीच पूर्ण होईल. परंतू उत्तराखंड सरकारने कुंभमेळ्याच्या वेळेपूर्वी समारोप करण्याची कोणतीही योजना नसल्याचे स्पष्ट केले तेव्हा हे अनुमान थांबले.

दरम्यान, दोन आखाड्यांनीही कुंभमेळ्यात आपली छावणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोन्ही आखाडे पंचायती श्रीनिरंजनी आखाडा आणि तपो निधी श्रीआनंद आखाडा हे आहेत. दोन्ही आखाड्यांनी ठरवले आहे की ते १७ एप्रिलपासून त्यांच्या छावण्या बंद करतील. हा निर्णय कोरोनामुळे होत असलेल्या भयानक स्थितीला पाहून घेण्यात आला आहे.