पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘लॉकडाऊन’ न वाढवण्याचे दिले संकेत, पण…

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुकारण्यात आलेले २१ दिवसांचे लॉकडाऊन न वाढवण्याचे संकेत दिले आहे. मात्र, लॉकडाऊन काळातले निर्बंध, सोशल डिस्टन्सिंग पाळन गरजेचं आहे. असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच लॉकडाऊन संपल्यावर आवश्यक असे धोरण आखणं ही गरजेचं आहे. असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संसर्गाचा प्रभाव रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. लॉकडाऊनचा कालावधी १४ एप्रिल रोजी संपणार असल्याने, पुढे काय? लॉकडाऊन अजून वाढणार की संपणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता. कारण लॉकडाऊन मुळे अवघा देश ठप्प झाला आहे. हातावरचे पोट असलेले हजारो कामगार रस्त्यावर आले आहे. त्यांच्यासाठी सरकार उपाय योजना करत आहे. मात्र तरीही लॉकडाऊन संपणार की नाही हा प्रश्न प्रत्येकाच्या मनाला घोंगावत होता. पण केंद्रीय मंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदींनी संवाद साधला असताना, तूर्तास तरी लॉकडाऊन संपेल असे संकेत दिले आहे.

केंद्रीय मंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुढे बोलताना मोदी म्हणाले, भारताने आता दुसऱ्या देशांवर अवलंबून न राहता ‘मेक इन इंडिया’ ला चालना देण्याची ही संधी आहे. भारताच्या निर्यातीवर होणाऱ्या परिणावर बोलताना ते म्हणाले की, उत्पादन व निर्यातीस चालना देण्याबाबत कृतिशील असा कार्यक्रम आखण्यास मंत्र्यांना सूचना देण्यात आल्या आहे. तसेच भारताला अजून काही देशामध्ये आपली निर्यात वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. मोदींनी जीवनावश्यक व अत्यावश्यक गोष्टींच्या पुरवठ्यावर तसेच किंमतीत वाढ व काळाबाजार करणाऱ्यांवरती सार्वजनिक वितरण व्यवस्थेला (पीडीएस) देखरेख ठेवण्याचे आदेश दिले आहे. तसेच गर्दी होऊ नये यासाठी काळजी घेण्यात यावी असे, त्यांनी सांगितले.