Lockdown 2.0 : PM मोदींनी ‘या’ 7 गोष्टींसाठी मागितली देशातील जनतेची ‘साथ’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे लॉकडाउन पुढे ढकलण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी कोरोना व्हायरसचा पराभव करण्यासाठी देशातील लोकांना सात संकल्प करण्यास सांगितले आहे. पीएम मोदी म्हणाले की, या संकल्पामुळे भारतातून कोरोना व्हायरस दूर होईल. पंतप्रधान मोदींचे सात संकल्प जाणून घेऊया…

1. आपल्या घरातील वडीलधाऱ्यांची विशेष काळजी घ्या – विशेषत: ज्यांना दीर्घकालीन आजार आहे त्यांची आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागेल, त्यांचे कोरोनापासून खूप संरक्षण केले पाहिजे.

2. लॉकडाउन आणि सामाजिक अंतराचे पूर्णपणे पालन करा, मुख्यत: घरात तयार केलेला फेस कव्हर किंवा मास्कचा वापर करा.

3. आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, आयुष मंत्रालयाने दिलेल्या सूचनांचे पालन करा, गरम पाणी, काडा याचे सतत सेवन करा.

4. कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य सेतु अ‍ॅप डाउनलोड करा.

5. शक्य तेवढे गरीब कुटुंबाची जास्तीत जास्त काळजी घ्या, त्यांच्या अन्नाची आवश्यकता पूर्ण करा.

6. आपण आपल्या व्यवसायात, उद्योगात आपल्यासोबत काम करणाऱ्या लोकांशी सहानुभूती बाळगली पाहिजे, कोणालाही आपल्या नोकरीवरुन काढून टाकू नका.

7. कोरोना वॉरियर्स (डॉक्टर, पोलिस आणि सफाई कामगार) यांचा आदर करा.