मतदान न केल्याने पंतप्रधान मोदी दिग्वीजय सिंहवर भडकले, म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तेथील उमेदवार पसंत नसल्यानेच दिग्वीजय सिंह यांनी मतदान केले नाही. हा तुमचा घरचा मामला आहे. जे प्रथम मतदान करणार आहेत, त्यांना तुम्ही कसला संदेश दिला. दिग्गीराजा तुम्ही खूप मोठा अपराध केला असून लोकशाहीचा अपमान केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सकाळी रतलाम येथील प्रचार सभेत केला.

भोपाळमध्ये रविवारी मतदान होते. तेथून दिग्वीजय सिंह काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांचे मतदान गुना मतदारसंघात होते. मात्र, भोपाळमध्ये अडकून पडल्याने ते मतदान करायला गेले नाहीत. यावरुन दिग्वीजय सिंह यांच्यावर चौफेर टिका होऊ लागली आहे. जर काँग्रेसचा उमेदवार व मध्य प्रदेशचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले दिग्वीजय सिंह मतदान करत नाही तर त्यांनी लोकांना मतदान करा असे सांगण्याचा व मत मागण्याचा अधिकार नसल्याचा आरोप सुरु झाला आहे.

प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली. तर माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी हा लोकशाहीचा अपमान असल्याचे सांगितले. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रतलाम येथे प्रचार सभा सुरु होती. त्यात त्यांनी दिग्गी राजावर निशाणा साधला.

मोदी म्हणाले, दिग्गी राजा जर तुम्हाला त्या मतदारसंघातील उमेदवार पसंत नसेल तर तो तुमच्या घरचा मामला आहे. भोपाळमध्ये आपला पराभव दिसत असल्यानेच तुम्ही गल्ली गल्ली जात स्वत:चे मत सोडून मताची भीक मागत होता. तुम्ही झाकीर नाईकला घाबरत नाही. मग मतदारांना का घाबरता. तुम्ही पहिल्यांने मत देणाऱ्या तरुणांना काय संदेश देणार. लोकशाहीचा तुम्ही अपमान केला आहे, अशा शब्दात मोदी यांनी दिग्गीराजाची हजेरी घेतली. दिग्वीजय सिंह यांच्या मतदान न करण्याचा काँग्रेसला मोठा तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे.