खोटे बोलणे हि तर काँग्रेसची सवय – नरेंद्र मोदी 

रायबरेली : उत्तर प्रदेश वृत्तसंस्था- उत्तर प्रदेशच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर नाव नघेता निशाणा साधला आहे. त्यांनी आज रायबरेली या सोनिया गांधी यांच्या लोकसभा मतदारसंघात ११०० कोटींच्या कामाचे लोकार्पण केले. त्यावेळी नरेंद्र मोदी बोलत होते. लोकार्पण समारंभा नंतर नरेंद्र मोदी यांनी एका विराट सभेला संबोधित केले तेव्हा त्यांनी काँग्रेस वर नाव नघेता टीका केली.

भारतीय रेल्वेच्या कोच फॅक्ट्रीच्या पाहणी दौऱ्याला आल्यावर नरेंद्र मोदी यांनी रायबरेली येथील विशाल जन सभेला संबोधित केले. त्यावेळी नरेंद्र मोदी म्हणले कि , २००७ मध्ये कोच फॅक्ट्रीचे काम सुरु झाले. त्यानंतर त्याचे काम २०१० साली पूर्ण करण्यात आले तेव्हा काँग्रेसने  १००० कोच बनवून तयार होतील असे काँग्रेसने सांगितले होते तेव्हा पासून ते आमच्या हाती सत्ता येईपर्यंत एक हि कोच या ठिकाणहून बाहेर पडले नाहीत फक्त दुरुस्तीचे काम या ठिकाणी केले जात होते. काँग्रेसला खोट बोलण्याची सवयच आहे असे म्हणत मोदींनी कोच फॅक्ट्रीकडे कसे दुर्लक्ष केले या कडे लक्ष वेधले.

काँग्रेसचे सरकार असताना त्यांनी फॅक्ट्रीचे  काम करू दिले नाही. आमच्या हाती सरकार आली तेव्हा रायबरेलीच्या रेल्वे फॅक्ट्री मधील फक्त ३ टक्के मशीन काम करत होत्या.  सत्तेत येताच आम्ही कामाला चालना दिली आणि येथील व्यवस्था सुधारून तीन महिन्यात नवीन कोच बनवून आम्ही येथून बाहेर काढले.  सध्या येथून वर्षाकाठी ७१२ कोच  बनवले जातात तर १४०० कोच वर्षाला बनवण्याचा आमचा  मानस असून येत्या काळात हीच उपलब्धी ५००० कोच पर्यंत घेऊन जाण्याची आमची धारणा आहे असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.  नरेंद्र मोदी यांचा आजचा दौरा हा येत्या लोकसभेची निवडणूक डोळ्या समोर ठेवूनच आखण्यात आला होता असा राजकीय वर्तुळात अंदाज लावला जात आहे. आजच्या कार्यक्र्मावरून देशाचे सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेश मध्ये भाजप आपला सत्तेचा मार्ग मजबूत करत असल्याचे दिसून येते आहे.