…म्हणून परदेश दौऱ्यादरम्यान PM मोदी विमानतळावरच राहतात, HM अमित शहांनी लोकसभेत सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार परदेश वारी करत असतात. यावेळी ते विमानाच्या तांत्रिक थांब्यादरम्यान एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये न राहता विमानतळावरच राहतात. अशी माहिती गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. पंतप्रधान हे विमानतळावरच राहतात आणि तेथेच अंघोळ करून पुढील आपल्या दौऱ्यासाठी निघतात असे अमित शहा यांनी सांगितले.

शक्यतो इतर देशांचे पंतप्रधान आणि महत्वाचे नेते अशा वेळेस पंचतारांकित हॉटेलमध्ये राहतात. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनावश्यक खर्च टाळण्यासाठी विमानतळावरच राहत असल्याचे अमित शहा यांनी सांगितले आहे.

नरेंद्र मोदी हे आपल्या परदेश दौऱ्यावर खूप खर्च करतात या प्रश्नाला उत्तर देताना अमित शहा यांनी ही माहिती दिली. यावेळी अमित शहा हे लोकसभेमध्ये बोलत होते.

काय म्हणाले नेमकं अमित शहा यावेळी

मोदी हे त्यांच्या खासगी आणि सार्वजनिक जिवनामध्ये वावरताना खूप शिस्त पाळतात. मोदी परदेश दौऱ्यावर स्वत:बरोबर केवळ २० % कर्चमारी घेऊन जातात. त्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्याही मर्यादीत असते. आधी प्रत्येक अधिकारी वेगळी गाडी वापरायचा आता तसं होतं नाही. आता सर्वजण एका मोठ्या गाडीत किंवा बसने प्रवास करतात. एसपीजी सुरक्षेची अनेकदा गांधी घराण्याकडून पायमल्ली झाली मात्र पंतप्रधानांनी असे कधीही केलेले नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच सुरक्षा यंत्रणांसंदर्भातील नियमांचे पालन करतात, असे देखील अमित शहा यावेळी लोकसभेत म्हणाले. काही जणांसाठी सुरक्षारक्षकांकडे त्यांच्या भोवती असणे हे स्टेटस सिम्बॉल समजले जाते. अनेकांनी या सुरक्षेसंदर्भातील नियम मोडल्याचे लक्षात आले आहे. मात्र आपण सर्वांनी या संदर्भात मोदींचा आदर्श घ्यायला हवा अशा शब्दात शाह यांनी मोदींचे कौतुक केले.

Visit : Policenama.com