बहरीनमध्ये प्रधानमंत्री मोदींचे भव्य स्वागत ; भारतीय समुदायाला केले संबोधित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रधानमंत्री मोदी तीन देशांच्या यात्रेवर आहेत. शनिवारी ते बहरीनला पोचले. तेथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. नरेंद्र मोदी बहरीनला जाणारे पहिले प्रधानमंत्री ठरले आहेत. बहरीन या देशामध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी असे सांगितले कि, भारताने आपली अर्थव्यवस्था पुढच्या ५ वर्षात दुपटीने वाढवण्याचा निर्धार केला आहे. ते म्हणाले आजघडीला आमच्या समोर आमची अर्थव्यवस्था ५ ट्रिलिअन डॉलर्सची करण्याचे लक्ष असून आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार दुपटीने वाढणार असल्याचा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

बहरीनमध्ये भारतीय जनसमुदायाला संबोधित करताना ते म्हणाले, की भारत प्रत्येक स्तरावर प्रगती करत आहे. भारताकडे असलेल्या प्रतिभेचा जगभर सन्मान होत असल्याचे दिसून येत आहे. भारताच्या चांद्रयान मोहिमेची जगभर चर्चा होत आहे. भारताच्या या मोहिमेमुळे जगाला हादरा बसला आहे. भारतीय समुदायाला संबोधित करताना माजी वित्त मंत्री अरुण जेटली याना त्यांनी विनम्र आदरांजली अर्पित केली. आपल्या प्रिय मंत्र्याच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली.

आज भारताची डिजिटल क्षेत्रातल्या देवाणघेवाणीची सर्वत्र चर्चा होत आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की , भीम अँप, यूपीआय आणि जन-धन खाते यासारख्या डिजिटल माध्यमांमुळे भारतात बँकिंग अधिक सुलभ झाले आहे. भारताच्या डिजिटल व्यवहारावर जगभर चर्चा होत आहे. जगभरातील बँक आणि विक्रेते भारतातील रुपे कार्ड स्वीकारत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –