PM मोदींच्या बांगलादेश दौऱ्यानंतर शेख हसीनांची ‘ती’ साडी चर्चेत !

दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – पश्चिम बंगाल, आसाममधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी आणि शनिवारी दोन दिवसाच्या बंगलादेश दौऱ्यावर होते. या दौऱ्यातील त्यांच्या भाषणांबरोबरच त्यांनी हिंदू मंदिराला भेट दिली. दरम्यान, पश्चिम बंगाल, आसाममधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या दौऱ्यावरुन आरोप प्रत्यारोपांमुळे दौरा चांगलाच गाजला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या सर्वोसर्वा ममता बॅनर्जी यांनी बांगलादेश दौर्‍यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. मोदींचा बांगलादेश दौरा हा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग आहे, अशी टीका ममतांनी केली होती. मात्र, ममतांनी ही टीका केल्यानंतर नेटकऱ्यांचं लक्ष बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी नेसलेल्या साडीकडे गेलं आहे.

दरम्यान, अवामी लीगच्या नेत्या आणि देशाच्या पंतप्रधान असणाऱ्या शेख हसीना यांनी शुक्रवारी ढाका विमानतळावर पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. बांगलादेशच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये शेख हसीना या मोदींसहीत उपस्थित होत्या. ढाक्यापासून ३५ कि.मी. अंतरावर असलेल्या सावर येथे शहिदांच्या राष्ट्रीय स्मारकावर आयोजित या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या दोन्ही पंतप्रधानांना विशेष मानवंदना देत त्यांचं स्वागत करण्यात आलं.

मोदी आणि शेख हसीना हे सैन्याचं अभिवादन स्वीकारत मंचाकडे एकत्रच चालत गेले. मात्र, यावेळी शेख हसीना यांनी नेसलेल्या साडीच्या पदराकडे आता भारतीय नेटकऱ्यांचं लक्ष गेलं आहे. शेख हसीना यांनी नेसलेल्या साडीचा काठ पदर हा हिरव्या रंगाचा होता त्यावरील नक्षीकाम हे कमळाच्या फुलांचं होतं. कमळ हे पंतप्रधान नरेेंद्र मोदी ज्या पक्षाचं म्हणजेच भारतीय जनता पार्टीचं प्रतिनिधित्व करतात त्याचं निवडणुक चिन्ह आहे. अनेकांनी मोदी आणि शेख हसीना यांचा हा फोटो शेअर करत हसीना यांच्या साडीच्या पदराभोवती गोल करुन त्यांनी कमळाचं नक्षीकाम असणारी साडी नेसल्याचं लक्षात आणून दिलं आहे. नेटवर या कमळाची नक्षी असणाऱ्या साडीवरुन तुफान चर्चा सुरु आहे. मोदींच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी पश्चिम बंगालमधील खडगपुर येथील मोर्चाला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी, “पश्चिम बंगालमध्ये निवडणुका सुरू आहेत आणि पंतप्रधान बांगलादेशात जातात आणि बंगाल बद्दल भाषणं देतात. हे निवडणुकीच्या आचारसंहितेचे संपूर्ण उल्लंघन आहे,” असं म्हटलं होतं.