PM मोदींनी आज मोडलं वाजपेयी यांचं रेकॉर्ड, बनले सर्वाधिक काळ सत्तेत राहणारे ‘नॉन-काँग्रेस’चे पंतप्रधान, जाणून घ्या इतरांचा कालावधी

नवी दिल्ली : पीएम नरेंद्र मोदींनी गुरुवारी त्यांच्याच पक्षातील दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांना मागे टाकत सर्वात जास्त कालावधीत सत्तेत राहणारे नॉन-काँग्रेस पंतप्रधान म्हणून विक्रम नोंदवला. वाजपेयी आपला सर्व कार्यकाळ मिळून 2,268 दिवस देशाचे पंतप्रधान होते, जे आजपर्यंत सर्वात जास्त काळ सत्तेत राहणारे नॉन-काँग्रेस पंतप्रधान होते. पीएम मोदींनी गुरूवारी त्यांना याबाबतीत मागे टाकले.

26 मे 2014 पासून पीएम आहेत नरेंद्र मोदी
2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवला. त्यांनी 26 मे 2014 ला पंतप्रधान पदाची शपथ घेतली. नंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने आणखी मोठा विजय मिळवला आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनले. आता ते भारतीय इतिहासात चौथे सर्वात जास्त कालावधीसाठी सेवा देणारे पंतप्रधान बनले आहेत.

कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले नॉन-काँग्रेस पंतप्रधान
वाजपेयी 3 वेळा भारताचे पंतप्रधान होते. प्रथम 1996 मध्ये पीएम झाले परंतु बहुमत सिद्ध करू शकले नाहीत. त्यांनतर ते 1998 आणि 1999 मध्ये पंतप्रधान झाले आणि 2004 पर्यंत सत्तेत होते. वाजपेयी पहिले असे नॉन-काँग्रेस पंतप्रधान होते ज्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला होता.

जवाहर लाल नेहरू सर्वात जास्त काळ होते पंतप्रधान
सर्वात जास्त काळ पंतप्रधान पदावर राहाण्याचा विक्रम जवाहरलाल नेहरूंच्या नावावर आहे. ते 16 वर्ष 286 दिवसांपर्यंत पंतप्रधान होते. दुसर्‍या नंबरवर त्यांची मुलगी आणि इंदिरा गांधी 15 वर्ष 350 दिवसांपर्यंत देशाच्या पंतप्रधान होत्या.

सर्वात जास्त काळात तिसर्‍या नंबरवर मनमोहन सिंह
नेहरू आणि इंदिरा गांधींनंतर मनमोहन सिंह सर्वात जास्त कालावधी पर्यंत सेवा देणारे तिसरे पंतप्रधान आहेत. ते 10 वर्ष 4 दिवसांपर्यंत देशाचे पंतप्रधान होते. ते 22 मे 2004 पासून 26 मे 2014 पर्यंत पंतप्रधान होते.

गुलजारी लाल नंदा यांच्या नावावर सर्वात कमी कालावधी
भारतातील सर्वात कमी कालावधीसाठी पंतप्रधान पदावर राहण्याचा रेकॉर्ड गुलजारी लाल नंदा यांच्या नावावर आहे. लाल बहादुर शास्त्री यांच्या निधनानंतर ते 11 जानेवारी 1966 पासून 24 जानेवारी 1966 पर्यंत 13 दिवसांसाठी काळजीवाहू पंतप्रधान होते. तत्पूर्वी जवाहर लाल नेहरू  यांच्या निधनानंतर सुद्धा ते 27 मे 1964 ते 9 जून 1964 पर्यंत काळजीवाहू पंतप्रधान होते.