रडारपासून वाचण्याच्या दाव्यानंतर आता ‘या’ दाव्यामुळे पंतप्रधान मोदी झाले ट्रोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भारतीय विमानांना रडारपासून वाचविण्याच्या वक्तव्यानंतर आता मुलाखतीतील एक वक्तव्य चांगलंच ट्रोल होत आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर तर आता हद्द झाली अशा प्रकारच्या कमेंट्स सोशल मिडीयावर येताना दिसत आहेत.

काय आहे वक्तव्य ?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्यूज नेशन चॅनलला एक मुलाखत दिली. शनिवारी ही मुलाखत देण्यात आली. या मुलाखतीदरम्यान मोदी म्हणाले की मी १९८७-८८ मध्ये पहिल्यांदा डिजीटल कॅमेरा वापरला आहे. त्यावेळी याचा आकार खुप मोठा होता. माझ्याकडे डिजीटल कॅमेरा होता. तेव्हा खुप कमी लोकांकडे ईमेल असायचा. मी अडवाणींची एक सभा होती. त्या सभेत मी त्यांचे छायाचित्र काढून ते ईमेलद्वारे दिल्लीला पाठवलिले होते. तसेच आडवणी ते पाहून हैराण झाले की, माझे रंगीत छायाचित्र कसे काय आले?

https://twitter.com/i_theindian/status/1127650139345018880

ट्रोल

पंतप्रधान मोदींच्या पहिल्यांदा १९८७-८८ मध्ये ईमेल वापरल्याच्या दाव्यावर ट्विटरवर चांगलंच ट्रोलींग सुरु झालं आहे. अनेकांनी याचे फॅक्ट चेक करत ट्वीट केले आहेत. अर्थशात्रज्ञ रुपा सुब्रमण्या यांनी ट्विट करून म्हटले आहे की, १९९५ मध्ये अधिकृतरिच्या ईमेल सेवा लॉन्च केली गेली. तर मग भारतात पीएम मोदींनी याचा वापर १९८८ मध्य़े कसा केला?

तर अभिनेते प्रकाश राज यांनी तर ट्वीट करून त्यांची खिल्ली उडवली आहे. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, भारतीय नागरिकांना माहित आहे की, नव्वदीमध्ये सुरु झालेल्या डिजीटल कॅमेरा आणि ईमेल सर्विसचा वापर त्यांनी ८० च्या दशकात केली. उल्लू बनाने की भी हद होती है,. तर दुसऱ्या ट्वीटमध्ये, CUT ..CUT. CUT. One more take please. Try this line sir Ji ……..”Suno ! असंही म्हटलं आहे. बाय रोड चलते हैं, उनकी रडार को लगेगा की बस आ रही है, जुमला का भी हद होता है.

आणखी काही ट्विट्स

https://twitter.com/i_theindian/status/1127650139345018880

https://twitter.com/Nehr_who/status/1127797322778169344