शरद पवारांच्या ‘व्हायरल’ व्हिडीओवर PM मोदींची ‘खरमरीत’ टीका (व्हिडीओ)

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – आज पंतप्रधान मोदींची महाराष्ट्रात पहिली सभा झाली. पंतप्रधान मोदींनी यावेळी शरद पवारांना घेरण्याचा प्रयत्न केला. शरद पवार यांच्या व्यासपीठावर एका कार्यकर्त्याला कोपऱ्याने मागे ढकलतानाचा व्हिडिओ समोर आला. याच व्हिडीओवरुन पंतप्रधान मोदींनी पवारांना घेरण्याचा प्रयत्न केला. साकोली मतदार संघात पंतप्रधान मोदींची सभा पार पडली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्यांना निवडून द्या असे आवाहन मतदारांना केले.

मोदी पवारांवर टीका करताना म्हणाले की एवढ्या मोठ्या नेत्याला साधा कार्यकर्ता सहन होत नाही. ज्या पक्षाच्या नेत्याला कार्यकर्ता नको आहे त्या पक्षाचे काय होणार. पवारांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवरुन पंतप्रधान मोदींनी पवारांवर खरमरीत टीका केली.

https://twitter.com/Sapnameratootg1/status/1183034880113856512

कोणत्या मुद्द्यावर बोलले पंतप्रधान मोदी
प्रचार सभेदरम्यान मोदी म्हणाले की फडणवीसांच्या नेतृत्वाला मतदान करा. यावेळी भारताचा जगभरात गौरव करण्यात येत असल्याचे देखील सांगितले. लोकसभेला मतदान केलेल्या मतदारांचे देखील त्यांना आभार मानले. ते म्हणाले की जनादेशामुळे संपूर्ण जगात भारताचा आवाज ओळखला जातो.

काश्मीर मुद्यावर बोलताना मोदी म्हणाले की, 70 वर्षानंतर काश्मीर स्वतंत्र झाला. सीमेपलीकडून होणारा दहशतवाद संपला. काश्मीर भारताचा शिरोमणी असल्याचा उल्लेख त्यांनी केला. कलम 370 वर विरोधकांची भूमिका संशयास्पद आहे, हिंमत असेल तर घोषणापत्रात कलम 370 बद्दल काही तरी नमूद करा असे आव्हान त्यांना विरोधकांना केले. मोदी म्हणाले की आमच्या सरकारने मुस्लिम महिलांना मोठा दिलासा दिला. तीन तलाक पद्धत रद्द केली.

राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधताना मोदी म्हणाले की राष्ट्रवादी काँगेस जनतेची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात भाजपला मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी सभेत उपस्थितांना केले.
Visit : policenama.com
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी