PM मोदींचा CM ममता बॅनर्जींवर ‘हल्लाबोल’, म्हणाले – ‘कट कमिशन मिळत नसल्यानं ‘राज्य’ सरकार ‘केंद्रा’च्या ‘स्कीम’ नाही लागू करत (व्हिडीओ)

कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा आरोप केला आहे. कोलकातामध्ये पंतप्रधानांनी डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहाण्याने राज्य सरकारवर जोरदार हल्ला केला. यावेळी नाव न घेता ते म्हणाले, कटमनी नसल्याने, सिंडिकेट चालत नसल्याने केंद्राच्या योजना राज्य सरकार लागू करत नाही. यावेळी मोदी यांनी कोलकाता बंदराचे नाव डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी करण्याची घोषणा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौर्‍यावर आहेत. आज स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त तरूणांना संबोधित करताना मोदी म्हणाले, देशातील तरूण सीएए समजून घेत आहेत, परंतु, दुर्दैवाने विरोधी पक्ष समजून घेण्यास तयार नाहीत. याशिवाय ते म्हणाले, आकाशात एक चंद्र चमकत असला तरी बंगालने जगात भारताचे नाव चमकत ठेवण्यासाठी अनेक चंद्र दिले आहेत. सुभाषचंद्र बोस, जगदीश चंद्र, केशव चंद्र, विपीन चंद्र, बंकिम चंद्र, ईश्वर चंद्र असे डझनभर चंद्र आहेत, ज्यांनी देशाचे नाव जागतिक स्तरावर उंचावले आहे. स्वामी विवेकानंद व रविंद्रनाथ टागोर यांनी जगाला जागृत करण्याचे काम केले.

पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौर्‍यावर असून ते शनिवारी राजभवनात राहणार होते. परंतु, तेथे न थांबता ते बेलूर मठात गेले. त्यांनी तेथेच मुक्काम केला. मिळालेल्या वृत्तानुसार मोदी हे पहाटे चारच्या आरतीतही सहभागी झाले होते, असे समजते. आज त्यांनी स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या तरूणांना संबोधित केले.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/