PM मोदींनी अमेरिकेत वाजवला विकासाचा ‘डंका’, प्रत्येक भारतीयाकडे युनिक ID आणि बँक अकाउंट
न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संयुक्त राष्ट्र संघातील न्यूयॉर्कमध्ये ब्लूमबर्ग ग्लोबल बिझनेस फोरम ला संबोधित केले. पंतप्रधानांनी सांगितले की सध्या भारतात तेच सरकार पुन्हा निवडून आले आहे जे मागील पाच वर्षांच्या काळात होते. आमच्या पक्षाने निवडणुकीतील हा मोठा विजय मागील कार्यकाळातील कामकाजाच्या बळावर मिळवला आहे. जागतिक गुंतवणूकदारांना त्यांनी भारतामध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे.
मोदींनी सांगितले की आम्ही दिवाळखोरी आणि बॅंकेच्या घोटाळ्यांमधून बाहेर येण्यासाठी कडक नियम बनवले आहेत. पीएम म्हणाले की आम्ही अनेक टॅक्स रिफॉर्म देखील केले आहेत. गेल्या पाच वर्षात ३७० दशलक्ष लोकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडले आहे. ते पुढे म्हणाले की मागील काही वर्षांपासून एअर पॅसेंजर ट्रॅफिकची ग्रॉथ मोठ्या प्रमाणावर होत असून याबाबतीत भारताने जगात तिसरा नंबर पटकावला आहे. आधी टॅक्सचे जाळे होते मात्र आता जीएसटीमुळे संपूर्ण देशात एकच टॅक्स झाला आहे.
भाषणात PM मोदी म्हणाले की, आज भारत देशाच्या प्रत्येक नागरिकाकडे आधारचा यूनीक आयडी आणि मोबाइल आहे. योजनांचा लाभ भ्रष्टाचाराच्या त्रासाशिवाय नागरिकांपर्यंत पोहोचतो. तसेच लॉजिस्टिक्स परफॉर्म इंडेक्स मध्ये भारताचे रँकिंग १० क्रमांकांनी सुधारले असून वर्ल्ड बँक ईज ऑफ डुईंग इंडेक्समध्ये ६३ रॅकिंगची सुधारणा झाल्याचे मोदींनी सांगितले.
‘काही दिवसांतच मिळते वीज कनेक्शन’ :
मोदींनी सांगितले की, आधी वीज जोडणी मिळण्यासाठी लोकांना अनेक वर्षे लागत मात्र आता लोकांना काही तासांतच कनेक्शन मिळते. या वेळी मोदींनी गेल्या २० वर्षात जेवढी परकीय गुंतवणूक (FDI) झाली त्याच्या ५०% तर आम्ही ४ वर्षांच्या आत मिळवली आहे असे सागीतले.
#WATCH PM at Global Business Forum in #NewYork: Friends, your desires&our dreams match perfectly. Your technology and our talent can change the world; Your scale&our skills can speed up global economic growth….And if there is any gap anywhere;I will personally act as a bridge. pic.twitter.com/T0TbGhP5mu
— ANI (@ANI) September 25, 2019
अणुऊर्जा क्षेत्रात भारत आदर्शवत कामगिरी करणार :
यावेळी PM म्हणाले की आपल्यासमोर नवीन न्यूक्लियर एनर्जीची समस्या उद्भवली आहे, जर भारताला आण्विक ऊर्जा पुरवठादारांच्या गटात स्थान मिळाले तर आम्ही जगासमोर आदर्श उभा करू. यावेळी पीएम ने सांगितले की आम्ही जल जीवन अभियान चालू केले असून देशामध्ये सिंगल युज प्लास्टिक बंद केले आहे. ५ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बाबत प्रश्नांची उत्तरे देताना मोदींनी ग्लोबल बेंचमार्किंग सिस्टम नुसार काम चालू असल्याचे सांगितले.
पीएम ने सांगितले की आम्ही नवीन विमानतळ बनवित आहोत, रेल्वेची विकासकामे वेगाने चालू आहेत, प्रत्येक कुटुंबाला घर देण्याची योजना इन्फ्रास्ट्रक्चर विभागाने बनवली आहे. आम्ही ऑर्गेनिक फूड संदर्भात भारताला जगातील सर्वात मोठे बाजारपेठ बनवू इच्छितो.
लवकरच गाठणार ५ ट्रिलियन डॉलर आयकॉनॉमीचे लक्ष्य :
२००० नवीन हॉस्पिटल बनविण्याबद्दल आम्ही पावले उचलली असून आम्ही डिजिटल इंडिया ला प्राधान्य देत आहोत. आम्ही स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून तरुणांना प्रोत्साहन देत आहोत. पीएमने सांगितले की आम्ही हळूहळू ५ ट्रिलियन डॉलरच्या आयकॉनॉमीच्या दिशेने प्रवास करत असून लवकरच आमचे लक्ष्य मिळवू.
जपानसह विकसित करत आहोत शिक्षण मॉडेल :
एजुकेशन अँड प्राइवेट सेक्टर वरून पीएम मोदींनी दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरात सांगितले की आमच्याकडे टॅलेंट असून आम्ही इनव्होवेशनवर भर देत आहोत. मोदींनी स्पष्ट केले की आम्ही जपानच्या मदतीने नवीन मॉडेल डेव्हलप करत आहोत ज्याच्या मदतीने आगामी काळात आमची युवा मुले प्रशिक्षण घेतील.आम्ही नवीन जॉब क्रियेशनवर जोर देत आहोत आणि त्या आधारावर अभ्यासक्रमास प्राधान्य देत आहोत.