PM नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून आखातातील तणावाबाबत व इतर ‘चर्चा’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध परस्पर विश्वास आणि समजुतीवरुन बांधले गेले आहेत आणि ते बळकट व सामथ्याने वाढले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पहाटे अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दूरध्वनीवर बोलताना सांगितले.

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढला असून त्यामुळे संपूर्ण जगालाच युद्धाच्या खाईत लोटले जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला. पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, त्यांचे कुटुंब आणि अमेरिकेच्या जनतेला नवीन वर्षात आरोग्य, समृद्धी आणि यशस्वी होण्याच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान म्हणाले की, भारत अमेरिका संबंध, विश्वास, परस्पर आदर आणि समजुतीवर आधारित, बळकट व सामर्थ्याने वाढले आहेत.

पंतप्रधानांनी मागील वर्षात दोन्ही देशांमधील सामरिक भागीदारी अधिक प्रगल्भ करण्याच्या महत्वपूर्ण प्रगतीवर प्रकाश टाकला आणि परस्पर हितसंबंधातील सर्व क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी अध्यक्ष ट्रम्प यांच्याबरोबर काम करत राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/