PM मोदींची मोठी घोषणा ! 2025 पर्यंत देशातल्या 25 पेक्षा अधिक शहरात Metro धावणार

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रयत्नांमुळेच दिल्लीला पहिली मेट्रो मिळाली. आम्ही सत्तेत आलो तेव्हा 5 शहरांमध्ये मेट्रो सेवा होती. आता 18 शहरांमध्ये मेट्रो धावत आहे. तर 2025 पर्यंत 25 पेक्षा अधिक शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू होणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) यांनी सोमवारी (दि. 28) केली.

दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चालक विरहित मेट्रो सेवेचा शुभारंभ केला आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदींनी या सेवेचे लोकार्पण केले आहे. त्यावेळी ते पंतप्रधान मोदी बोलत होते. पहिल्या टप्प्यात मजेंटा लाईनच्या जनकपुरी पश्चिम ते नोएडाच्या बॉटनिकल गार्डन स्थानकादरम्यान चालकविरहित मेट्रो गाड्या धावतील. त्यानंतर या सेवेचा विस्तार होईल. 2025 पर्यंत देशातल्या 25 पेक्षा अधिक शहरांमध्ये मेट्रो सुरू होणार आहे. तसेच देशात होत असलेल्या अशा बदलांमुळे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात बदल होतो. आधी मेट्रो सेवेबद्दल कोणतेही स्पष्ट धोरण नव्हत. मात्र आम्ही मेट्रो सेवेवर वेगाने काम केल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

तीन वर्षांपूर्वी मजेंटा लाईनवर मेट्रो सेवा सुरू झाली. त्यानंतर आता याच मार्गावर चालकविरहित मेट्रो सेवा सुरू होत आहे. भविष्यातील गरजांचा विचार करून देश पुढे जात आहे. काही वर्षांपूर्वी संभ्रमाचं वातावरण होतं. भविष्याची तयारी नव्हती. त्यामुळे पायाभूत सुविधांची मागणी आणि प्रत्यक्षात उभारल्या जाणाऱ्या सुविधा यांच्यात मोठ अंतर होते. शहरीकरणाला आव्हान मानून आपण त्याच रुपांतर संधीत करायला हवे असे मत मोदीनी व्यक्त केले आहे.