PM Modi | ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधानांनी केले PM मोदींचे कौतूक, म्हणाले – ‘चीनसाठी भारत एकमेव उत्तर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  PM Modi | ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अबॉट (Former Australian Prime Minister Tony Abbott) यांनी म्हटले की, चीनबाबत जेवढे प्रश्न उपस्थित केले जात आहेत, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे केवळ आणि केवळ भारताकडे आहेत. ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अबॉट यांनी ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रात लिहिलेल्या एका लेखात (article in an Australian newspaper) म्हटले आहे की, चीनबाबत जेवढे सुद्धा (PM Modi) प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचे उत्तर भारत आहे.

यासोबतच ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधानांनी म्हटले आहे की, भारताने लवकरात लवकर जागतिक बाजारात आपली दावेदारी मजबूत करावी.
पीएम मोदींच्या (PM Narendra Modi) कार्यकाळात भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संबंधात अभूतपूर्व सुधारणा झाली आहे.

टोनी अबॉट यांनी काय लिहिले आहे…

2015 पर्यंत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान असलेले टोनी अबॉट यांनी लिहिले आहे की, भारत आणि ऑस्ट्रेलियामधील ’मुक्त व्यापार करार” चीनच्या विरोधात जात आहेत.
’लोकशाही’ देशांसाठी हा अतिशय महत्वाचा संकेत आहे.
जगातील दुसर्‍या उगवत्या महाशक्ती दिवसेंदिवस जास्त आक्रमक होत चालल्या आहेत.
हे सर्वांच्या हिताचे आहे की, भारताने लवकरात लवकर या देशांमध्ये आपले स्थान मिळवावे.

त्यांनी पुढे लिहिले आहे की, कारण व्यापार करार राजकारणासह अर्थशास्त्राबाबत सुद्धा होतात आणि भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये एक जलद मुक्त व्यापार करार चीनच्या विरूद्ध एकत्र येत असलेल्या लोकशाही देशांसाठी एक महत्वाचा संकेत असेल, सोबतच भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये दिर्घकालिन समृद्धीला प्रोत्साहन देईल.

 

अबॉट यांना चीनकडून मिळाला आहे झटका

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणून टोनी अबॉट यांनी चीनसोबत एक द्विपक्षीय फ्री ट्रेड अ‍ॅग्रीमेंट लागू केला होता, जो 2015 मध्ये प्रभावी झाला होता.
यासोबतच फ्री ट्रेड अ‍ॅग्रीमेंटच्या एक वर्षापूर्वी चीनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या राजकीय दौर्‍याची यजमानी सुद्धा टोनी अबॉट यांनी केली होती.

त्याच दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि चीनचे संबंध खुप मजबूत दिसत होते.
परंतु, त्यानंतर चीनवर आरोप होऊ लागले की चीनच्या कम्यूनिस्ट पार्टीने ऑस्ट्रेलियाच्या अनेक नेत्यांना आर्थिक मदत केली आहे.
आणि नंतर टोनी अबॉट यांना आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
यासोबतच कोरोना काळात चीन आणि ऑस्ट्रेलियाचे संबंध खुप बिघडले.
तर, चीनने ऑस्ट्रेलियावर बॅलेस्टिक मिसाईलने हल्ला करण्याची सुद्धा धमकी दिली होती.

 

चीनपासून खुप दूर जावे ऑस्ट्रेलियाने

अबॉट यांनी जोर देत म्हटले आहे की, ऑस्ट्रेलियाला बिजिंगपासून दूर जाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. ऑस्ट्रेलियासाठी भारत एक ‘स्वाभाविक भागीदार‘ आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया समान विचारधारेच्या लोकशाही आहेत, ज्यांचे संबंध आतापर्यंत अविकसित होते, किमान तोपर्यंत, जोपर्यंत नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले नव्हते.
परंतु, पीएम मोदी यांनी आपल्या कार्यकाळात क्वाडचे पुन्हा पुरूज्जीवन केले आणि आता भारत-ऑस्ट्रेलियाचे संबंध खुप सुधारले आहेत, जे आणखी जवळ येण्याची आवश्यकता आहे.

पंतप्रधान मोदींचे केले कौतूक

अबॉट यांनी म्हटले की, पीएम मोदी यांच्या कार्यकाळात भारताने ऑस्ट्रेलियाला वार्षिक नौदल सरावात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले.
ज्यामध्ये लवकरच भारत, संयुक्त राज्य अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि रॉयल नेव्ही भाग घेणार आहे.

चीनने पाश्चिमात्य देशांच्या नैतिकतेचा चुकीचा फायदा घेतला आहे आणि त्यांच्या धोरणांचे शोषण केले आहे, त्यांच्या टेक्नॉलॉजिचा फायदा घेतला आहे आणि स्वताला मजबूत केले आहे.
म्हणून आता वेळ आली आहे की जागतिक शक्तींमध्ये भारताने आपली मजबूत दावेदारी सादर करावी.

 

Web Title : PM Modi | former pm tony abbott article on indua australia relation conflict with china free trade

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra School Reopen | राज्याच्या ग्रामीण भागातील 5 वी ते 7 वी अन् शहरांमधील 8 वी ते 12 वीचे वर्ग 17 ऑगस्टपासून सुरू होणार

Gold Price Today | सोने घसरून 5 महिन्याच्या निच्चांकी स्तरावर पोहचले, खरेदीपूर्वी पहा 10 ग्रॅम सोन्याचे नवीन दर

IPCC Report | आगामी काही वर्षात मुंबईसह 12 शहरांना मोठा धोका? ‘या’ रिपोर्टनुसार धक्कादायक खुलासा