‘PM मोदींनी दिली होती ‘ती’ मोठी ऑफर, परंतु मी नाकारली’, शरद पवारांचा ‘गौप्यस्फोट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एकत्रित काम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्यासमोर प्रस्ताव मांडला होता. परंतु आपण मोदींची ऑफर नाकारली असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. राज्यात महाविकासआघाडीच्या नेतृत्वात नवीन ठाकरे सरकार स्थापन झालं. सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच ते वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलत होते.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापनेला घेऊन राज्यात मोठा पेच निर्माण झाला. भाजप-सेनेला बहुमत मिळालं होतं. परंतु पुढे दोन्ही पक्षात फूट पडली. कारण शिवसेना मुख्यमंत्रीपदावर अडून होती. आणि भाजप मात्र असं काहीच ठरलं नसल्याचं सांगत होतं. यानंतर दोन्ही पक्षात ओढाताण झाली. अखेर भाजप-सेनेची 25 वर्षांची युती तुटली. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि सेनेकडे 145 आकडा होता(भाजप- 105, सेना-56). काँग्रेस-राष्ट्रवादीचा(राष्ट्रवादी- 54, काँग्रेस- 44 )आकडा सत्ता स्थापन करण्याएवढा नव्हता. यानंतर सत्ता स्थापनेचा मोठा पेच निर्माण झाला. कारण कोणत्याच पक्षाकडे बहुमताचा आकडा नव्हता. अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली.

यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचा एकत्र येण्याचा विचार सुरू झाला. यासाठी खलबतं सुरू झाली. अखेर महाराष्ट्रात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस असं तिघांचं म्हणजेच महाविकासआघाडीचं सरकार येणार जवळपास निश्चित होऊ लागलं. यासाठी तिन्ही पक्षांच्या बैठका सुरू झाल्या. अशातच एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची भेट झाली होती.

याच भेटीबाबत पवारांनी गौप्यस्फोट केला आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्याला सोबत काम करण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु आपण मोदींची ऑफर नाकारल्याचंही पवारांनी सांगितलं.

Visit : Policenama.com