PM Modi यांच्या जेवणावर खर्च केले जात नाहीत सरकारी पैसे, Prime Minister स्वत: करतात आपल्या जेवणाचा खर्च

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Modi | सरकारी तिजोरीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या जेवणावर पैसे खर्च केले जात नाहीत. त्यांचा खर्च ते स्वतः उचलतात (PM Modi). माहितीच्या अधिकाराखाली (RTI) मागवलेल्या माहितीमध्ये पंतप्रधान कार्यालयाच्या केंद्रीय जन माहिती अधिकार्‍याने (PMO) माहिती दिली आहे (PM Modi Food Expenditure).

 

आरटीआयच्या उत्तरात म्हटले आहे की, पंतप्रधानांच्या (Prime Minister) जेवणावर सरकारी बजेटमधून खर्च होत नाही. सक्षम व्यक्तींनी केवळ स्वत:चा खर्च उचलू नये, तर गरजूंना मदत करण्यासाठी पुढे यावे, असे पंतप्रधानांचे मत आहे. त्यांनी कोरोनाच्या काळात गरिबांना मोफत गहू आणि तांदूळ वाटपाची व्यवस्था केली.

 

PM मोदींच्या आवाहनावर आर्थिकदृष्ट्या संपन्न लोकांनी स्वेच्छेने घरगुती गॅस सिलिंडरवरील सबसिडी सोडली. खुद्द पंतप्रधानांनी सुद्धा याचे पालन केले. एक आरटीआय पीएमच्या कपड्यांवरील खर्चाबाबत दाखल करण्यात आली होती, त्यानंतर पीएमओने सांगितले की, पंतप्रधान स्वतः त्यांच्या कपड्यांचा खर्च देतात. (PM Modi)

 

आरटीआय अंतर्गत पीएमओला विचारण्यात आले की पंतप्रधानांच्या जेवणावर किती खर्च होतो? जेवणावर सरकारी खर्च होत नाही, असे उत्तर यावर मिळाले. पंतप्रधानांच्या निवासस्थानाची देखभाल केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जाते. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) वर वाहनांची जबाबदार आहे. पगार आणि भत्त्यांची माहितीही माहिती अधिकारात मागवण्यात आली होती. या प्रश्नाच्या उत्तरात नियमाचा हवाला देत पगाराची माहिती न देता केवळ नियमानुसार वेतनवाढ केल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

पंतप्रधानांनी स्वतः संसद भवनाच्या कॅन्टीनमध्ये पैसे दिले
2 मार्च 2015 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनाच्या कॅन्टीनमध्ये पोहोचून सर्वांना आश्चर्यचकित केले. पंतप्रधानांनी कॅन्टीनमध्ये जेवण करण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यांनी पाणी सुद्धा आरओमधूनच घेतले. शाकाहारी थाळीसाठी पंतप्रधानांनी स्वतः 29 रुपये दिले होते.

कोण-कोणत्या आरटीआय

2015 मध्ये आरटीआय दाखल करण्यात आली होती की ट्विटरवर आल्यानंतर पीएम मोदींनी किती ट्विट केले.

नरेंद्र मोदींनी पंतप्रधान झाल्यापासून किती सुट्ट्सर घेतल्या आहेत.

पीएम मोदींनी किती परदेश दौरे केले आहेत.

पंतप्रधानांची भाषणे कोण लिहितात आणि त्यावर किती खर्च केला जातो, अशीही विचारणा करण्यात आली होती.

 

कॅन्टीनमध्ये बंद सबसिडी व्यवस्था
एनडीए सरकारच्या कार्यकाळात, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जानेवारी 2021
पासून संसद भवनाच्या कॅन्टीनमध्ये खासदारांना अनुदानित खाद्यपदार्थांची तरतूद रद्द केली आहे.
यापूर्वी कॅन्टीनमध्ये अनुदानावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात होते. कॅन्टीनमध्ये खाद्यपदार्थ, शीतपेये अगदी स्वस्तात मिळायचे.

 

Web Title :- PM Modi | government money is not spent on pm narendra modis food pmo replied on rti

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | गोळीबार करुन 3.5 कोटी लुणाऱ्या टोळीचा ग्रामीण पोलिसांकडून पर्दाफाश, 1.43 कोटी रुपये जप्त

 

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचे ढोल ताशांच्या गजरात आगमन

 

e-Search Report Maharashtra | ऑनलाइन मिळकतींचा शोध (ई-सर्च रिपोर्ट) घेण्याची सुविधा पुन्हा सुरू