‘नरेंद्र मोदी बिर्याणी खाण्यासाठी पाकिस्तानात गेले होते’

नवी दिल्‍ली : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. जसजसे मतदान जवळ येऊ लागले आहे. तसे राजकारण्यांचे एकमेकांवर टीका, आरोप-प्रत्यारोप करणे सुरु आहे. आता काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०१५ मध्ये पाकिस्तानात बिर्याणीचा आस्वाद घेण्यासाठी गेले होते. अशा शब्दात प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. उत्तरप्रदेश मधल्या फैजाबाद येथील सभेदरम्यान त्या बोलत होत्या.

यावेळी बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या, जर तुम्ही लोकांचा आवाज ऐकू शकत नसाल, तर मग कोणती सत्ता तुमच्या हाती आहे ? काय फायदा मिळाला तुमच्या सत्तेने ? पंतप्रधान गेली ५वर्षे फक्त खोटं बोलत आहेत. देशातले तरुण बेरोजगार आहेत. त्यांना देशातील तरुणांची कसलीच चिंता नाही. पंतप्रधानांना गरिबांसाठी वेळ नाही. भाजप सरकार जनतेविरोधी आणि शेतकरी विरोधी आहे. असे प्रियांका गांधी म्हणाल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये अचानक पाकचा दौरा करत तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतली होती. या भेटीवरून प्रियांका गांधी मोदींवर टोला लगावला ‘२०१५ मध्ये पाकिस्तानात बिर्याणीचा आस्वाद घेण्यासाठी गेले होते’. असे प्रियांका म्हणाल्या.

तसेच येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रियांका गांधी म्‍हणाल्‍या की, राम मंदिराचे प्रकरण अद्याप न्यायालयात प्रलंबित असल्या कारणाने आपण तिथे जाणार नाही.

Loading...
You might also like