Coronavirus : ‘कोरोना’शी लढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी दिला ‘खास मंत्र’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे गुरुवारी देशात मृत्यूची संख्या 4 झाली आहे. तसेच संसर्ग झालेल्यांची संख्या वाढून 177 झाली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आज संध्याकाळी 8 वाजता देशाला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी खास मंत्र दिला. ‘हम स्वस्थ, तो जग स्वस्थ’ असा खास मंत्र मोदींनी दिला आहे.

‘हम स्वस्थ, तो जग स्वस्थ’
यावेळी बोलताना मोदींनी सांगितले की जर तुम्ही कोरोना बाबत तितके जागरूक नसाल आणि तुम्ही काही होणार नाही असे म्हणून जर बाहेर फिरत असाल तर ही बाब अत्यंत चुकीची आहे. असे सांगत कोरोनाचा धोका किती मोठा आहे याची जाणीव नागरिकांना करून दिली. ‘हम स्वस्थ, तो जग स्वस्थ’ या मंत्रानुसार कोरोनाशी लढण्यासाठी या काळात आपण संयम ठेवणे आणि संकल्प करणे आवश्यक आहे असे मोदी म्हणाले. सर्वात आधी आपण स्वतः निरोगी राहणे गरजेचे आहे. त्यामुळे कृपया बाहेर पडून नये असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले. आपण केलेला संकल्प हा कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावेल असे देखील मोदी म्हणाले.

मोदी सरकारच्या वतीने, सर्व राज्य सरकारांना सांगण्यात आले आहे की सरकारी कर्मचारी, वैद्यकीय व्यवसायिक आणि लोकप्रतिनिधी, माध्यमांचे प्रतिनिधी बाहेर पडून काम करू शकतात. कारण त्यांचे कार्य महत्वाचे आहे. यांच्याशिवाय 65 वर्षांवरील वयोवृद्ध व्यक्तींनी घरी राहण्यासाठी सूचना देण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय दहा वर्षाखालील मुलांना घरी राहण्यास सरकारने सांगितले आहे. त्यांना घर सोडण्यास मनाई आहे.