सुषमा स्वराज यांनी ‘प्रोटोकॉल’ला ‘पीपल्स’कॉल मध्ये बदललं : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत मंगळवारी दिवंगत माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात सभेत पंतप्रधान मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी नरेंद्र मोदींनी सुषमा स्वराज यांच्या आठवणीला उजाळा देत सांगितले की त्या अशा परराष्ट्र मंत्री होत्या ज्यांनी प्रोटोकॉलला पीपल्स कॉलमध्ये बदललं.

सुषमा स्वराज यांनी आपल्या कार्यकाळात ज्या ज्या लोकांनी त्यांना मदत मागितली त्या अनेक लोकांची मदत त्यांनी केली. याशिवाय सोशल मिडियावर देखील त्या सक्रिय असायच्या. ज्यामाध्यातून त्यांनी अनेकांच्या समस्या सोडवल्या.

या आयोजित श्रद्धांजली सभेत पंतप्रधान मोदी म्हणाले, त्या त्यांच्या विचारासंबंधित अत्यंत दृढ होत्या आणि त्या विचारांना जीवनात प्रयोगात आणण्यासाठी कायम प्रयत्न करत होत्या. त्यांचे भाषण फक्त प्रभावी नसायचे तर प्रेरणादायी देखील होते. पंतप्रधान मोदींनी सांगितले की ज्या मंत्रालयाची त्यांना जबाबदारी देण्यात आली, सुषमा स्वराज यांनी त्या मंत्रालयाच्या कार्य संस्कृतीत मूलभूत बदल केले. परराष्ट्र मंत्रालयाला शक्यतो प्रोटोकॉलला जोडण्यात येते परंतू सुषमाजीनी त्यापुढे एक पाऊल पुढे टाकून त्याला पीपल्स कॉलमध्ये बदलले. परराष्ट्र मंत्रालयाला त्यांनी लोकउपयोगी बनवले.


पंतप्रधान मोदींनी सुषमा स्वराज यांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, सुषमाजींचे भाषण प्रभावी तर होतेच त्याबरोबर त्यातून प्रेरणा मिळत असे. सुषमाजींच्या वक्तव्यातून मिळणारे विचारांतून त्यांची दूरदृष्टी कळतं होती. वसुधैव कुटूंबकम ला परराष्ट्रमंत्रालय कसे सिद्ध करु शकते हे त्यांनी जगभरात पसरलेल्या भारतीय लोकांना मदत करण्याच्या माध्यमातून दाखवून दिले.

आरोग्यविषयक वृत्त –