‘HOWDY MODI’ PM मोदींनी मागवले लोकांकडून ‘सल्ले’, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प देखील कार्यक्रमात राहणार ‘उपस्थित’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेत पीएम मोदींनी आपल्या कार्यक्रमात HOWDY MODI साठी आता नमो अ‍ॅपवर लोकांकडून सल्ले मागवले आहेत. 22 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदीबरोबर HOWDY MODI कार्यक्रमात मंचावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित असणार आहे. यावेळी 50 हजार भारतीय उपस्थित असू शकतात.

हाऊडी मोदी म्हणजे हाऊ डू यू डू. अमेरिकेत टेक्सास राज्यातील लोक याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. ह्यूस्टन टेक्सास राज्याचा हिस्सा आहे. त्यामुळे स्थानिक लोकांच्या भावनांना जोडण्यासाठी रॅलीचे नाव हाऊडी मोदी ठेवण्यात आले आहे.

हा कार्यक्रम ह्यूस्टनच्या एनआरजी स्टेडियम मध्ये होणार आहे. याचे आयोजन करणाऱ्या टेक्सास इंडिया फोरमच्या मते, 50 हजार पेक्षा जास्त लोक या कार्यक्रमात भाग घेतील. यासाठी नोंदणी करण्यात येत आहे. 2014 मध्ये पंतप्रधान मोदींनी मेडिसन स्के्वअरमध्ये तेथील भारतीयांशी संवाद साधला होता. त्यानंतर 2016 साली त्यांनी सिलिकॉन व्हॅलीत संबोधित केले होते. या दोन्ही कार्यक्रमात 20,000 पेक्षा जास्त लोक होते.

ट्रम्प आणि मोदींची तिसरी भेट
मोदी आणि ट्रम्प यांच्यात या वर्षातील तिसरी भेट आहे. जी – 7 आधी दोन्ही नेत्यांनी जपानमध्ये जी – 20 शिखर परिषदेत भेट घेतली होती. 2016 साली अमेरिकेत राष्ट्रपती उमेदवार म्हणून 5000 भारतीयांना संबोधित केले होते. ते असे एकटे राष्ट्रपती उमेदवार होते ज्यांनी भारतीय अमेरिकन्सला संबोधित केेले होते. ते म्हणाले होते की जर निवडून आलो तर भारत आमचा सर्वात चांगला मित्र राष्ट्र असेल.