PM मोदींच्या घरी जमले बॉलिवूडमधील ‘सेलिब्रेटी’, ‘किंग’ शाहरुख – आमिर खाननं दिलं पंतप्रधानांना ‘वचन’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोक कल्याण निवास स्थानावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधानांनी कला आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या भेटी घेतल्या. यावेळी कार्यक्रमासाठी शाहरुख खान, आमिर खान, सोनम कपूर, कंगना राणावत, जॅकलिन फर्नांडिस, इम्तियाज अली, एकता कपूर, अनुराग बसून अशा दिग्गजांसहित अनेक कलाकार उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींनी केले हे आवाहन
पंतप्रधान मोदी यावेळी बोलताना म्हणाले की, महात्मा गांधीजींचे विचार दूर दूरपर्यंत पोहचलेले आहेत. ते म्हणाले की रचनातनमकतेची शक्ती अफाट आहे आणि आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. जेव्हा महात्मा गांधींच्या आदर्शांना लोकप्रिय करण्याचा विचार केला, तेव्हा चित्रपट आणि दूरदर्शनच्या जगातल्या अनेकांनी चांगले काम केले. या दरम्यान पीएम मोदी यांनी या सेलिब्रिटींना दांडी येथील संग्रहालय आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देण्याचे आवाहन केले.

काय म्हणाले बॉलिवूड कलाकार
पंतप्रधान मोदी म्हणाले की, महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्र चांगले काम करत आहे त्यावर शारुख, आमिर, कंगना आणि एकता कपूर यांनी एका व्हडिओ संदेश द्वारे पंतप्रधानांच्या या वक्तव्याचे कौतुक केले आहे.

पंतप्रधानांसोबत जमले सर्व कलाकार
यावेळी आमिर खान म्हणाले की, ‘बापूंचे आदर्श लोकप्रिय करण्याचा विचार करण्याबद्दल पंतप्रधान मोदींची प्रशंसा करायचे आहे. सर्जनशील लोक म्हणून आपण बरेच काही करू शकतो. मी पंतप्रधानांना आश्वासन देतो की आम्ही यावर अधिक लक्ष केंद्रित करू. किंग खान शाहरुख खान म्हणाले, ‘एका व्यासपीठावर सर्वांना एकत्र केल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो. मला वाटते की आपल्याला गांधीजींशी भारत आणि जगाची नव्याने ओळख करून द्यावी लागेल. पंतप्रधानांनी या कार्यामध्ये आम्हाला समाविष्ट करून एक जबाबदारीची भावना व्यक्ती केली असल्याचे आनंद एल राय यांनी म्हंटले.

या आधी पानपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हंटले होते की, बापूंच्या स्वप्नांतला भारत, जो सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या आदर्शांवर चालणार आहे. बापूंच्या राष्ट्रवादाचे हे सर्व घटक संपूर्ण जगासाठी आदर्श असतील, राष्ट्रपिताची मूल्ये स्थापित करण्यासाठी, मानवतेच्या भल्यासाठी, प्रत्येक भारतीयांनी राष्ट्रवादाचा प्रत्येक संकल्प सिद्ध करण्याचा संकल्प केला पाहिजे. आज मी देशाला ‘एक व्यक्ती – एक संकल्प’ करण्यासाठी उद्युक्त करतो.

visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like