PM Modi | खालिस्तानी दहतवाद्यांच्या गटाने दिली PM मोदींना धमकी, म्हणाले – ‘तुम्हाला शांत झोपू देणार नाही’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Modi | खालिस्तानी दहशतवाद्यांचा गट शिख फॉर जस्टिस (SFJ) ने प्रधानमंत्री मोदी यांना धमकी दिल्याचा दावा करण्यात आला आहे. पीएम मोदी (PM Modi) यांच्या संभाव्य अमेरिका दैर्‍यापूर्वी ही धमकी देण्यात आली आहे. क्वाड लीडर्स समिट आणि संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) कार्यक्रमात जेव्हा पंतप्रधान सहभागी होतील तेव्हा खालिस्तानी दहशतवादी गट व्हाईट हाऊसच्या बाहेर आंदोलन करताना दिसू शकतो.

मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी भूमिकेमुळे खलिस्तानी दहशतवादी गट मोदींवर नाराज आहे. यामुळेच ते पंतप्रधानांच्या या दौर्‍याचा विरोध करण्याचा प्लॅन करत आहेत. एसएफजेचे जनरल कौन्सल गुरपतवंत सिंह पन्नून यांनी म्हटले की, आम्ही पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमात विघ्न आणू. त्यांना अमेरिका दौर्‍यात शांतपणे राहू देणार नाही.

एसएफजे केवळ व्हॉट्सअप ग्रुप
सूत्रांनुसार एसएफजे कोणतेही मोठी संघटना नाही. तिला कोणताही आधार नाही. या संघटनेचे अनेक व्हॉट्सअप ग्रुप आहेत जे केवळ प्रोपगंडा पसरवण्याचे काम करतात. या ग्रुपमध्ये मोठ्या संख्येने पाकिस्तानी आणि बहुतांश आयएसआय एजंट असल्याचा आरोप केला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात अमेरिकेच्या दौर्‍यावर जातील जिथे ते 24 सप्टेंबरला वॉशिंग्टनमध्ये क्वाड गटाच्या नेत्यांच्या शिखर संमेलना भाग घेतली. क्वाड नेत्यांच्या उपस्थितीत होणार्‍या या बैठकीत मुक्त तसेच समावेशी हिंद महासागर, अफगाणिस्तान संकटासह जागतिक आव्हानांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने एक वक्तव्य जारी केले आहे, ज्यामध्ये सांगितले आहे
की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 25 सप्टेंबरल न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या
(यूएनजीए) 76व्या सत्रात एक उच्चस्तरीय विभागाला सुद्धा संबोधित करण्याचा कार्यक्रम आहे.

वॉशिंग्टनमध्ये मोदींची राष्ट्रपती जो बायडेन आणि वॉशिंग्टनमध्ये मोदींची राष्ट्रपती जो बायडेन
आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यासोबत वेगळी द्विपक्षीय बैठक होणार आहे.
मोदी आणि बायडेन यांची द्विपक्षीय बैठक व्हाइट हाऊसमध्ये 23 सप्टेंबरला होणार आहे.

Web Titel :- PM Modi | khalistani terror group threatens to pm narendra modi us visit

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 215 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

भारतात YouTube च्या व्ह्यूअर्समध्ये वाढ, मागील वर्षापासून 45% पेक्षा जास्त लोकांनी टीव्हीवर पाहिले यूट्यूब

PMC Medical College | नॅशनल मेडिकल कमिशनकडून (NMC) पुणे मनपाच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी