सरकारनं सुरू केली 50000 कोटी रूपयांची योजना, मजुरांकडे 25250 रूपये कमाई करण्याची ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या कसं आणि कोणाला मिळणार फायदा ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूमुळे लाखो कामगार गावी परतले आहेत. आता गावातच रोजगार मिळावा यासाठी सरकारने आजच एक नवीन योजना सुरू केली आहे. प्रधान मंत्री गरीब कल्याण रोजगार अभियान अंतर्गत केंद्र सरकार पुढील १२५ दिवस गावातच स्थलांतरित कामगारांना रोजगार उपलब्ध करुन देत आहे. यासाठी केंद्र सरकारने ५० हजार कोटींची तरतूद केली आहे. या मजुरांना मनरेगा अंतर्गत काम मिळणार आहे. त्यांचे दैनंदिन वेतन अलीकडेच १८२ रुपयांवरून २०२ रुपये करण्यात आले आहे. म्हणजेच १२५ दिवसात ते २५,२५० रुपये कमावतील.

असा घ्या फायदा
गरीब कल्याण रोजगार अभियानातील कामगारांना त्यांच्या कौशल्यानुसार २५ शासकीय योजनांमध्ये काम मिळणार आहे. ही योजना देशातील ६ राज्यांमधील ११६ जिल्ह्यांमध्ये राबवली जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या बिहारच्या खगेरिया जिल्ह्यातून त्याचे उद्घाटन करणार आहेत.

कोणताही अर्ज करण्याची आवश्यकता नाही
या योजनेसाठी कोणालाही अर्ज करावा लागणार नाही. या योजनेसाठी राज्य व केंद्र सरकार स्वतः स्थलांतरित मजुरांची निवड करतील.

या जिल्ह्यांचा आहे समावेश
या मोहिमेअंतर्गत सरकारने ६ राज्यांमधील ११६ जिल्हे निवडले आहेत. या जिल्ह्यात सुमारे ६७ लाख स्थलांतरित कामगार परतले आहेत. या ११६ जिल्ह्यांमध्ये बिहारमधील ३२, उत्तर प्रदेशचे ३१, मध्य प्रदेशचे २४, राजस्थानमधील २२, ओडिसाचे ४ आणि झारखंडमधील ३ जिल्ह्यांचा समावेश आहे.

ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासावर काम केले जाईल
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी येत्या १२५ दिवसांत ५० हजार रुपयांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेशी संबंधित विहिरी, तलाव आदी पायाभूत सुविधा बांधल्या जातील, असे स्पष्ट केले आहे. त्या गावातील पंचायत इमारत जीर्ण झाली असेल, तर ती दुरुस्त केली जाईल. गावातच कृषी उत्पादनांच्या साठवणुकीसाठी गोदामे वगैरे बांधले जातील. जर गावतील कालवा फुटला असेल, तर त्याचीही दुरुस्ती केली जाईल.