NaMo App वर CAA साठी PM मोदींनी मागितला ‘पाठिंबा’, म्हणाले – ‘यामुळं नागरिकत्व रद्द केलं जात नाही तर देण्यात येतं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल कॅम्पेनला सुरुवात केली आहे. नमो अ‍ॅपच्या माध्यमातून त्यांनी लोकांना या कायद्याचे समर्थन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच यावेळी पंतप्रधानांनी हा कायदा नागरिकत्व देणारा असून नागरिकत्व हिरावणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान मोदींनी #IndiaSupportsCAA ट्विट करत लिहिले आहे की, सीएए द्वारे पीडित शरणार्थीला नागरिकता दिली जाते. हा कायदा कोणाचीच नागरिकता हिरावून घेत नाही. तसेच या हॅशटॅगच्या माध्यमातून तुम्ही CAA ला समर्थन देऊ शकता असे देखील मोदींनी यावेळी ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे.

CAA बाबत देशभरात मोठा गोंधळ सुरु आहे. CAA ला देशातून अनेक पक्षांनी रस्त्यावर उतरून विरोध दर्शवला आहे. यावेळी मोठी हिंसा झाल्याचे देखील पहायला मिळाले यामध्ये आतापर्यंत एकूण 19 लोकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/