PM मोदींना प्रचंड आवडली मल्टी स्टारर शॉर्ट फिल्म ‘फॅमिली’ ! ट्विट करत केलं ‘कौतुक’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईनसध्या देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रकोप सुरूच आहे. अनेक कलाकार लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देत आहेत. लोकांना ते वारंवार सोशल डिस्टेंसिंगचं महत्त्व सांगत आहेत. अलीकडेच बॉलिवूड कलाकारांनी एक शॉर्ट फिल्म तयार केली आहे. याचं नाव आहे फॅमिली. खास बात अशी की, एकही स्टार या सिनेमासाठी घराच्या बाहेर पडला नाही. यात भरपूर मनोरंजनही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या शॉर्ट फिल्मचं कौतुक केलं आहे.

बिग बी अमिताभ बच्चन, प्रियंका चोपडा, दिलजीत दोसांझ, रणबीर कपूर, आलिया भट, सोबतच साऊथ स्टार रजनीकांत, चिरंजीवी, मामूथी सोबत इतरही कलाकार लोकांना स्ट्राँग मेसेज देताना दिसत आहेत. पीएम मोदीही त्यांचे फॅन झाले आहेत. हा सिनेमा पीएम मोदींनाही खूप आवडला आहे. त्यांनीही याचं कौतुक केलं आहे.

मोदींनी ट्विट केलं आहे की, तुम्ही दूर राहूनही सोशल राहू शकता. एक खूप चांगला व्हिडीओ खूप चांगल्या मेसेजसोबत. तुम्हीही पहा.”

काय आहे स्टोरी ?

सुरुवातीला बिग बी काळा चष्मा शोधत असतात. नंतर दिलजीत दोसांझ झोपेत असलेल्या रणवीरला उठवतो. यानंतर एकेक करून सर्व चष्मा शोधू लागतात. नंतर हा चष्मा आलिया भटकडे मिळतो. जो प्रियंका त्यांना देते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like