‘दीदी तुमच्या घरी येऊन गुजराती डिश नक्‍की खाईन’, PM मोदींचा ‘मन की बात’मधून लता दीदींशी ‘संवाद’ ! (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लता मंगेशकर यांचा आज 90 वा वाढदिवस आहे. बॉलिवूडपासून राजकारण्यांपर्यंत सर्वांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लता मंगेशकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज आपला रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’मध्ये गानकोकिळा लता मंगेशकर यांच्याशी केलेले संभाषण ऐकवले.

मोदी आणि लता मंगेशकर यांच्यातील संवाद मन की बात मधून प्रसारित करण्यात आला. मोदी म्हणाले की , आज मन की बातमध्ये मी देशाच्या या महान कलाकाराबद्दल बोलणार आहे. आपल्या साऱ्या देशवासियांना दीदींचा खूप आदर आहे. त्या वयाने खूप मोठ्या आहेत. अमेरिकेसाठी रवाना होण्याआधी मी त्यांना फोन करून वाढदिवसाच्या आधीच शुभेच्छा दिल्या.

‘मला आनंद आहे की लतादीदी यांच्या मातोश्रीदेखील गुजराती होत्या आणि जेव्हा जेव्हा मला दीदींना भेटण्याचा योग आला तेव्हा तेव्हा त्यांनी मला कुठला ना कुठला गुजराती पदार्थ खाऊ घातला. मी लवकरच तुमच्या घरी येईन आणि तुम्ही तुमच्या हाताने बनवलेले गुजराती पदार्थ नक्की खाईन. दीदी आपले आशीर्वाद आमच्यावर आणि देशावर कायम असू देत. आपण नेहमी मला प्रेरणा दिली आहे.’

पंतप्रधानांचं कौतुक करत देशाच्या विकासासाठी काम करण्याच्या शुभेच्छा त्यांना दिल्या. हा संवाद सर्वांना ऐकवून मोदी म्हणाले की हा मोठी बहीण आणि लहान भावात झालेला संवाद होता.

Visit : Policenama.com