कोरोनाला रोखण्यासाठी ‘लढाई’ तीव्र; PM मोदी आज रात्री मंत्री-अधिकाऱ्यांशी करतील चर्चा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसचा कहर चालूच आहे. गेल्या काही दिवसात लाखांपेक्षा अधिक प्रकरणे दिवसाला येत आहेत आणि हजारोंच्या संख्येने लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर PM मोदी हे आज रात्री ठीक ८ वाजता बैठक घेणार आहेत. यामध्ये मंत्री आणि अधिकाऱ्यांशी ते चर्चा करतील. दरम्यान, पंतप्रधान हे मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

असे सांगितले जात आहे की पंतप्रधान मोदी कोरोना व्हायरस आणि लसीकरणाबद्दल रात्री ८ वाजता एक महत्वाची बैठक घेतील. या दरम्यान पंतप्रधान मोदी मंत्रालयातील सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. हे लक्षात घेण्यासारखे आहे की यापूर्वीच PM मोदी यांनी आरोग्य, पोलीस दल, रस्ते वाहतूक मंत्रालय आणि इतर अनेक मंत्रालये आणि विभागांशी बैठक घेतली आहे. त्यावेळी पंतप्रधानांनी सर्व मंत्रालयांना राज्य सरकारसोबत सुसंवाद साधण्यावर भर दिला होता.