‘कोरोना’ स्थितीवर PM मोदींची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, उद्धव ठाकरे म्हणाले – ‘महाराष्ट्राने वॅक्सीन वितरणासाठी बनवला टास्क फोर्स’

नवी दिल्ली : देशाच्या अनेक राज्यात कोरोना महामारी पुन्हा पसरू लागल्याने चिंतीत झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आज महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत महाराष्ट्राचे सीएम उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात कोरोना वॅक्सीनच्या चांगल्या वितरणासाठी एक टास्क फोर्स स्थापन केला आहे. याच बैठकीत दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांनी पीएम मोदी यांना सांगितले की, 10 नोव्हेंबरला दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट दिसून आली आहे. त्यांनी अनेक मुद्दे पीएम मोदी यांच्या निदर्शनास आणून दिले.

या बैठकीत गृहमंत्री अमित शाह यांच्यासह कोरोनाने सर्वात जास्त प्रभावित आठ राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. या बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महाराष्ट्राचे सीएम उद्धव ठाकरे, गुजरातचे सीएम विजय रुपाणी, राजस्थानचे सीएम अशोक गहलोत, यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ, छत्तीसगढचे सीएम भूपेश बघेल सहभागी झाले होते.

महाराष्ट्राचे सीएम उद्धव ठाकरे म्हणाले – वॅक्सीनबाबत काम करत आहोत
पीएम मोदी यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महाराष्ट्राचे सीएम उद्धव ठाकरे यांनी पीएम मोदी यांना कोरोना वॅक्सीनबाबत माहिती दिली. महाराष्ट्राच्या सीएम कार्यालयानुसार, महाराष्ट्राचे सीएम उद्धव ठाकरे यांनी पीएम मोदी यांना सूचित केले की, ते सीरम इन्स्टीट्यूटचे अदर पूनावाला यांच्या सतत संपर्कात आहोत. ते म्हणाले, राज्याने वॅक्सीनचे वेळेवर वितरण करणे आणि लसीकरण कार्यक्रम कार्यान्वित करण्यासाठी एक टास्क फोर्सची स्थापना केली आहे.

दिल्लीचे सीएम केजरीवाल यांनी सांगितली राज्याची स्थिती
पीएम मोदी यांच्यासोबत बैठकीदरम्यान दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, दिल्लीत 10 नोव्हेंबरला कोरोनाची तिसरी लाट दिसून आली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री कार्यालयाने माहिती देताना सांगितले की, दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांनी पीएम मोदी यांना माहिती दिली की, दिल्लीत 10 नोव्हेंबरला 8600 कोरोना प्रकरणांसह तिसरी लाट आढळून आली. तेव्हापासून प्रकरणे आणि पॉझिटिव्ह दर सतत वाढत आहेत. तिसर्‍या लाटेची गंभीरता प्रदुषणासह अनेक कारकांमुळे आहे.

दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांनी पीएम यांना हस्तक्षेप करण्याची मागणी केली, जेणेकरून प्रदुषणापासून सूटका होऊ शकते. त्यांनी जवळच्या राज्यांत शेतातून जाळण्यात येणार्‍या सुक्या पिकांमुळे होणार्‍या प्रदुषणावर चिंता व्यक्त केली. यासोबतच सीएम केजरीवाल यांनी दिल्लीत तिसर्‍या लाटेपर्यंत केंद्र सरकारच्या हॉस्पिटलमध्ये अतिरिक्त 1000 आयसीयू बेडची मागणी केली आहे.

या राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
पंतप्रधानांनी घेतलेल्या कोरोना प्रभावित 8 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. यामध्ये दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम बंगाल, हरियाणा, गुजरात, केरळ आणि छत्तीसगढचा सहभाग होता.

कोरोना वॅक्सीनवर सुद्धा बैठक
आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्याशिवाय पीएम मोदी आणखी एक बैठक घेणार आहेत. या दूसर्‍या महत्वाच्या बैठकीत कोरोना वॅक्सीनवर चर्चा होईल. या मीटिंगमध्ये पीएम सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत कोरोना वॅक्सीनच्या वितरणावर चर्चा करतील.