पंतप्रधान मोदींनी घेतली अरूण शौरी यांची भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री अरूण शौरी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील रूबी हॉल रुग्णालयात भेट घेतली. तसेच, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

शौरी हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात संपर्क व माहिती तंत्रज्ञान मंत्री होते. शौरी काही दिवसांपुर्वी मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर त्यांना चक्कर आली होती. खाली पडल्याने त्यांना जखमी झाली होती. त्यामुळे त्यांना येथील रुबी हॉल रुग्णालयात उपाचारसाठी दाखल करण्यात आले आहे. येथे त्यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलीस महासंचालकांच्या तीन दिवसीय परषदेनिमित्त शुक्रवारी पुण्यात आले होते. रविवारी या परिषदेची सांगता झाल्यानंतर त्यांनी दुपारी शौरी यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. तसेच, त्यांच्या प्रकृती विचारपूस केली. यानंतर मोदी यांनी ट्विटरवर शौरी यांची भेट घेतल्याचे फोटो व्हायरल करत शौरी यांची भेट घेऊन त्यांचीशी संवाद साधला. त्यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करू असे म्हटले आहे.

Visit : Policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like