Coronavirus : घाबरण्याची अजिबात गरज नाही, आपण सर्वजण मिळून ‘कोरोना’चा ‘पराभव’ करू : PM नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनच्या वुहान शहरातून उद्भवलेल्या कोरोना विषाणूने जगभर दहशत पसरवली आहे. या विषाणूमुळे लाखो लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातही या प्राणघातक विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आता देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे लोक घाबरले आहेत.

देशवासीयांमधील भीती दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, घाबरून जाण्याची गरज नाही. योग्य खबरदारी घेत रहा. आपण सगळे एकत्रितपणे कोरोनाचा नक्कीच पराभव करू. पंतप्रधान मोदींचा हा संदेश आशा वेळी आला ज्यावेळी देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 14 हजाराच्या पुढे गेला आहे आणि कोरोनामुळे 480 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

लॉकडाऊनमध्ये रेशनिंग आणि आवश्यक सामानाची समस्या जाणवत असलेल्या लोकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विट केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी केंद्री मंत्री रामविलास पासवान यांचे ट्विट रि-ट्विट केले असून त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, एफसीआय देशात धान्य उपलब्धेतेसाठी सातातत्याने काम करत आहे.

पासवान यांच्या ट्विटनुसार 17 एप्रील रोजी 71 रॅकमधून 1.99 लाख मेट्रिक टन धान्य भरण्यात आले आहे. आणि 64 रॅकमधून 1.80 लाख मेट्रिक टन धान्य उतरविण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यांना 29.90 लाख मेट्रिक टन धान्य मोफत वितरणासाठी देण्यात आले आहे, असे पासवान यांनी सांगितले आहे.