PM Modi यांचा US दौरा ! अमेरिकेनं परत केल्या 157 कलाकृती, पीएम मोदींनी मानले आभार, प्रोटोकॉल तोडून भारतीयांना देखील भेटले

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) शनिवारी आपला अमेरिका दौरा संपवून भारतासाठी रवाना झाले. PM Modi यांच्या सोबत भारतातून अमेरिकेत नेण्यात आलेल्या 157 कलाकृती सुद्धा भारतात येत आहेत. 12व्या शतकात तयार केलेली नटराजची सुंदर कांस्य मूर्ती आणि 10व्या शतकातील दिड मीटर लांब नक्षीकाम केलेल्या पॅनलवरील सूर्यपुत्र रेवंतची प्रतिमा इत्यादी सारख्या 157 प्राचीन भारतीय कलाकृती भारतात परत आणण्यात येत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)
यांनी अमेरिका दौर्‍यावरून परतण्यापूर्वी ट्विटमध्ये लिहिले की, मागील काही दिवसात झालेल्या द्विपक्षीय आणि बहुपक्षीय बैठका, अमेरिकन कंपन्यांच्या सीईओसोबतची भेट आणि यूएनमध्ये संबोधन सारख्या विविध परिणाम देणारे कार्यक्रम झाले. मला विश्वास आहे की भारत आणि अमेरिकेचे नाते आगामी काळात आणखी मजबूत होईल. आपल्यात व्यक्ती ते व्यक्तीचे संपन्न नाते आपली मोठी संपत्ती आहे.

पीएम मोदी आणि अमेरिकन राष्ट्रपती जो बायडन यांनी संस्कृतीसंबंधी वस्तूंची चोरी, तस्करी रोखण्यासाठी सहकार्य वाढवण्याचा सुद्धा निर्णय घेतला. यामध्ये 10 व्या शतकापासून 14व्या शतकापर्यंत कलाकृती आहे. तसचे, 45 कलाकृती ईस पूर्व म्हणजे 2000 वर्ष जुन्या आहेत. एक कलाकृती सुमारे 2000 ईस पूर्व म्हणजे 4000 वर्ष जुनी आहे.

धातु, दगड, टेराकोटाद्वारे निर्मित : कांस्य प्रतिमांमध्ये लक्ष्मी, नारायण, बुद्ध, विष्णु, शिव-पार्वती आणि 24 जैन तीर्थंकर प्रमुख कलाकृती आहेत. कंकलामूर्ती, ब्रह्मी आणि नंदीकेस सारख्या देवी-देवतांच्या प्रतिमा सुद्धा आहेत. हिंदू धर्मात चित्रांमधून त्री-शीश ब्रह्मा, रथावर स्वार सूर्य, विष्णु आणि त्याचे सहकारी, दक्षिणमूर्तीच्या रूपात शिव, नृत्यशील गणेश प्रमुख आहेत. बौद्ध मूर्तींमध्ये बुद्ध, बोधिसत्व, मंजूश्री, तारा आणि जैन कलाकृतींमध्ये जैन तीर्थंकर, पदमासन तीर्थंकर, जैन चौबीसी यांचा समावेश आहे. सामभंग, ढोल वादन करणार्‍या महिलांच्या मूर्ती आहेत.

दरम्यान अमेरिकेतील भारतीयांना पीएम मोदींच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. यावेळी प्रोटोकॉल तोडून मोदींनी त्यांना अभिवादन केले.

हे देखील वाचा

PM Kisan | आयटीआर फाईल करणार्‍या शेतकर्‍यांना मिळू शकतात का ‘पीएम-किसान’चे 6 हजार? जाणून घ्या

UPSC Exam | ‘सारथी’ संस्थेच्या 21 विद्यार्थ्यांचे UPSC परीक्षेत घवघवीत यश

Ajit Pawar | ‘…कशी तुझी जिरवली आता भर 100 चं’, अजित पवारांची फटकेबाजी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : PM Modi | narendra modi emplanes for india with 157 artefacts after concluding his us visit

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update