बंगालने देशाला नेहमीच दिशा दाखविली : PM नरेंद्र मोदी

कोलकता – बंगालमध्ये सर्वात मोठ्या दूर्गा पूजा उत्सवाला गुरुवारी प्रारंभ झाला. पंतप्रधान मोदी यांनी या कार्यक्रमात ऑनलाईन सहभाग घेतला आणि बंगालच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. बंगालमधील लोकांनी देशाला वेळोवेळी दिशा दिली. या भूमितील महापुरुषांनी शस्त्र आणि शास्त्राची सेवा केली. रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, मां आनंदमयी, महर्षि अरबिंदो, शरतचंद्र चट्टोपाध्याय, रवींद्रनाथ टागोर, राजा राममोहन रॉय, विश्वचंद्र विद्यासागर यांचे नांव उच्चरताक्षणी प्रेरणा मिळते. बंगालच्या लोकांनी भारताचे नांव जगात उंचावले. शक्तीशाली बंगाली जनतेला मी नमन करतो, असे मोदी म्हणाले. दुर्गेची पूजा करताना आपण कोरोनाच्या महामारीपासूनही बचाव करुया. असे सांगून मोदी यांनी कोरोनापासून बचावण्यासाठी उपाययोजना सांगितल्या. ‘आपण एखाद्याचे दुःख दूर करतो, तीच खरी दूर्गा पूजा असते’ असे यावेळी मोदी म्हणाले.

पूर्वोत्तर राज्यांसाठी शेकडो कोटींच्या योजना माझ्या सरकारने कार्यन्वित केल्या आहेत. या सर्व राज्यांमध्ये पश्चिम बंगाल नवी उर्जा घेऊन उभा राहील असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगाल मध्ये २०२१च्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होणार आहेत. याकरिता भाजपने या कार्यक्रमाचे आयोजन केले. हा प्रचाराचाच एक भाग होता अशी टीका पश्चिम बंगाल मधील भाजपच्या विरोधकांनी केली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like